टाकळी हाजी
?टाकळी हाजी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शिरूर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | अरुणाताई दमुषेठ घोडे |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
टाकळी हाजी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]````टाकळी हाजी हे गाव पुणे जिल्ह्यातील घोडनदी नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. हे गाव दोन नद्यांच्या मध्ये वसलेले (घोडनदी व कुकडी)आहे,म्हणून या गावाला बेट भाग असेही म्हणले जाते. या गावात जगप्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे रांजणखळगे येथील कुकडी नदीवर आहे. शिरूर तालुक्यातील महागणपती व रांजणखळगे ही पर्यटन स्थळे पर्यटकांची मने आकर्षित करतात. शिरूर पासून हे गाव २२किमी अंतरावर आहे तर रांजणगाव पासून १८किमी वर आहे.या गावापासून अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव 10किमी अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.