Jump to content

टांगानिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टांगानिकाचे प्रजासत्ताक या पानावरून पुनर्निर्देशित)
टांगानिका (इ.स. १९६१-६२)
टांगानिकाचे प्रजासत्ताक (इ.स. १९६२-६४)

Tanganyika
Republic of Tanganyika

इ.स. १९६१इ.स. १९६२
टांगानिकाचा ध्वज चिन्ह
राजधानी दार एस सलाम
शासनप्रकार घटनात्मक राजेशाही (इ.स. १९६१-६२)
प्रजासत्ताक (इ.स. १९६२-६४)
राष्ट्रप्रमुख राष्ट्रप्रमुख -
-इ.स. १९६१-६२ एलिझाबेथ दुसरी
-इ.स. १९६२-६४ ज्युलियस न्यरेरे
पंतप्रधान राज्यपाल -
-इ.स. १९६१-६२ रिचार्ड टर्नबुल
अधिकृत भाषा स्वाहिली
इंग्लिश

टांगानिका (रोमन लिपी: Tanganyika ;), उत्तरकाळातील टांगानिकाचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: टांगानिक्याचे प्रजासत्ताक ; इंग्लिश: Republic of Tanganyika, रिपब्लिक ऑफ टांगानिका) हा पूर्व आफ्रिकेतील इ.स. १९६१ ते इ.स. १९६४ या कालखंडात अस्तित्वात असलेला एक देश होता. हिंदी महासागरव्हिक्टोरिया सरोवर, मालावी सरोवर, टांगानिका सरोवर या आफ्रिकेतील मोठ्या सरोवरांनी वेढलेल्या या देशात वर्तमान रवांडा, बुरुंडीझांझिबार वग़ळता टांझानियाच्या उर्वरित भूभागाचा समावेश होता, तर दार एस्सलाम येथे टांगनिक्याची राजधानी होती.. भूतपूर्व जर्मन पूर्व आफ्रिकेच्या वसाहतींना ९ डिसेंबर, इ.स. १९६१ रोजी स्वातंत्र्य मिळून या देशाची स्थापना झाली. २६ एप्रिल, इ.स. १९६४ रोजी या देशाचे विसर्जन झाले व याच्या भूभागात झांझीबाराचे सामिलीकरण होऊन वर्तमान टांझानियाचे प्रजासत्ताक स्थापले गेले.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "टांगानिक्याचा इ.स. १८८६ सालाच्या सुमाराचा नकाशा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)