Jump to content

ज्योती आमगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्योती आमगे
ज्योती आमगे
जन्म

ज्योती किशनजी आमगे
१६ डिसेंबर, १९९३ (1993-12-16) (वय: ३०)

[]
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पुरस्कार गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स नुसार जगातील सर्वात कमी उंचीच्या जीवित महिला
वडील किशनजी आमगे
आई रंजना आमगे
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
@JyotiAmge

ज्योती किशनजी आमगे (जन्म:१६ डिसेंबर, १९९३)[] ह्या एक भारतीय अभिनेत्री असून त्या गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स नुसार जगातील सर्वात कमी उंचीच्या जीवित महिला म्हणून प्रसिद्ध आहेत.[][][]

ज्योतीचा जन्म १६ डिसेंबर १९९३ रोजी किशनजी आणि रंजना आमगे यांच्या पोटी नागपूर येथे झाला.[] ज्योतीची पूर्ण उंची ६२.८ सेंटीमीटर (म्हणजे दोन फुटापेक्षा किंचित जास्त) इतकी आहे. त्यांची उंची कमी असण्यामागे अकॉड्रोप्‍लासिया नावाचा आजार कारणीभूत आहे. ही उंची चार महिन्याच्या बाळा इतकी आहे असे मानले जाते.[][]

१६ डिसेंबर २०११ रोजी आमगेच्या १८ व्या वाढदिवशी, त्यांना अधिकृतपणे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे ६२.८ सेंटीमीटर (२फूट /इंच) उंचीसह जगातील हयात असलेली सर्वात लहान महिला म्हणून घोषित करण्यात आले.[][]

गिनेस बुकसाठी ज्योतीची उंची मोजताना

इ.स. २०१२ मध्ये, त्या नेपाळच्या चंद्र बहादूर डांगी या जगातील सर्वात लहान माणसाला भेटल्या. गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ५७ व्या आवृत्तीसाठी या जोडीने एकत्र पोझ दिली होती.[]

लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये आमगे यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.[१०]

लोणावळा येथील ज्योती आमगेचा मेणाचा पुतळा

माध्यमे आणि अभिनय

[संपादन]

आमगेला इ.स. २००९ मध्ये 'बॉडी शॉकःटू फूट टॉल टीन' या ब्रिटिश माहितीपटात दाखवण्यात आले होते.[] त्या 'बिग बॉस ६' या भारतीय दूरचित्रवाणी कार्यक्रमात पाहुणी कलाकार म्हणून देखील सहभागी होत्या.

इ.स. २०१२ मध्ये इटालियन दूरचित्रवाणी 'चॅनेल ५' वर 'लो शो देई रेकॉर्ड' या कार्यक्रमाचे आमगे, यांनी तेओ मम्मुकारीसह, सूत्रसंचालन केले होते.

१३ ऑगस्ट २०१४ रोजी, त्यांना 'अमेरिकन हॉरर स्टोरी: फ्रीक शो'च्या चौथ्या सीझन मध्ये 'मा पेटिट' म्हणून एक भूमिका देण्यात आली होती.[][११] या कार्यक्रमाचे प्रक्षेपण ८ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आले होते.

समाज सेवा

[संपादन]

इ.स. २०२० मध्ये भारतातील 'कोविड-19च्या लॉकडाऊन' दरम्यान भारतीय नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यासाठी आमगे नागपूर पोलिसांसोबत सहभागी झाल्या होत्या.[१२]

अभिनयाची कारकीर्द

[संपादन]
  • चित्रपट आणि दूरचित्रवाणी वरील भूमिका
वर्ष शीर्षक भूमिका नोंदी
२००९ बॉडी शॉकःटू फूट टॉल टीन स्वतः ब्रिटिश माहितीपट
२०१२-२०१३ बिग बॉस ६ स्वतः पाहुनी कलाकार (दूरचित्रवाणी)
२०१४-२०१५ अमेरिकन हॉरर स्टोरी: फ्रीक शो मा पेटिट १२ भाग
२०१८ माथारम (लघुपट) N/A लघुपट
२०२० वर्ल्डस स्मालेस्ट वूमनः मीट ज्योती स्वतः TLC (टीव्ही नेटवर्क)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "New world's smallest woman: Ten things you need to know about Jyoti Amge". Guinness World Records. 14 December 2011. 16 December 2015 रोजी पाहिले. Born on 16 December 1993 (28), in Jaipur Jyoti measures 61.95 cm (2 ft) tall
  2. ^ "Tiny Teenager Stands Tall Despite Her Height of 23 Inches". foxnews.com. Fox News Channel. 9 April 2008. 20 July 2008 रोजी पाहिले.
  3. ^ "World's shortest woman appeals to Indians to observe coronavirus lockdown - Jyoti Amge, 26, who is 62.8 cm tall, took to the streets of Nagpur to urge compliance". The Guardian. 13 April 2020.
  4. ^ "Guinness World Records recognises Edward Niño Hernández as the world's shortest man". Gulf Today.
  5. ^ "indian is world's shortest living woman". द हिंदू. 2021-02-27 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "Meet the World's Shortest Woman: 26-Year-Old Actress Jyoti Amage". PEOPLE.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-10 रोजी पाहिले.
  7. ^ a b c Chaturvedi, Swati (17 April 2020). "Stay home, bond with family, urges Jyoti Amge, world's shortest woman". Hindustan Times (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "Prajakta Mali enjoys a fangirl moment with World's shortest woman Jyoti Amge; read post - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). March 6, 2020.
  9. ^ "World's shortest man, woman meet for first time". foxnews.colom. 29 August 2012. 13 March 2013 रोजी पाहिले.
  10. ^ Service, Tribune News. "Heads turn as worlds smallest woman Jyoti Amge arrives to vote in Nagpur". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2021-03-16 रोजी पाहिले.
  11. ^ Bucksbaum, Sydney (13 August 2014). "Meet American Horror Story: Freak Show's Newest Addition: Jyoti Amge, the World's Smallest Woman!". E!. 14 August 2014 रोजी पाहिले.
  12. ^ "Gandhigiri to corona helmet: Cops get creative to keep people indoors". The Economic Times. 15 April 2020.

बाह्य दुवे

[संपादन]