जॉनी लिव्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉनी लिव्हर

जॉनी लिव्हर
जन्म जॉनराव प्रकाशराव जनुमाला
७ जानेवारी १९५०
कनगिरी आंध्र प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र व्यावसायिक चित्रपट
वडील प्रकाशराव
आई करुणाम्मा
पत्नी सुजाता
अपत्ये जेस्सी
http://www.imdb.com/name/nm0505323/bio

जॉनी लिव्हर (ऑगस्ट १४, इ.स. १९५६:अमकम, प्रकाशम जिल्हा, आंध्र प्रदेश - ) हा बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता आहे.

याचे मूळ नाव जनार्दन राव असे आहे.

इतिहास[संपादन]

त्याचे वडिल गिरणी कामगार होते. त्याला सातव्या वर्गापासून शाळा सोडून बसस्टँड वर फेरीवाला म्हणून काम करावे लागले.तो तेथे सिनेस्टार्सची नक्कल करून व्यवसाय करीत असे.तो नंतर हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला.तेथे त्याने एका गेटटुगेदर दरम्यान एक हास्याभिनय केला.तेथूनच त्याच्या सहकार्‍यांनी त्याला 'जॉनी लिव्हर' हे नाव दिले.

त्यानंतर त्याने ऑर्केस्ट्रा मध्ये काम केले. गाण्यांचे मध्यंतरादरम्यान तो हास्याभिनय करीत असे.तो कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरला.त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले.त्यानंतर त्याला अनेक चित्रपटात काम मिळाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.