जॉनी डेप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन क्रिस्टोफर डेप दुसरा (९ जून, इ.स. १९६३ - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता आणि संगीतकार आहे.

याने प्लाटून या चित्रपटातील सहायक भूमिकेपासून आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानंतर एडवर्ड सिझरहँड्स, स्लीपी हॉलो, चार्ली अँड द चॉकोलेट फॅक्टरी आणि ॲलिस इन वंडरलँड सारख्या तिकिटखिडकीवरील यशस्वी चित्रपटांत त्याने कामे केली. पायरट्स ऑफ द कॅरिबियन चित्रपटशृंखलेत त्याने कॅप्टन जॅक स्पॅरोचे काम केले आहे.

डेपने भूमिका केलेल्या चित्रपटांनी जगभरात ८ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे.