जेम्स बाँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स बाँड (इंग्लिश: James Bond) हे ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग ह्यांनी इ.स. १९५३ साली बनवलेले एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स बाँड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये ००७ ह्या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. इयन फ्लेमिंगने बाँडवर ६ कादंबऱ्या व २ लघूकथा लिहिल्या. इ.स. १९६४ मधील फ्लेमिंगच्या मृत्यूनंतर इतर ६ लेखकांनी बाँडच्या पात्रावर आधारित कथा लिहिल्या.

जेम्स बाँड नायक असलेले आजवर २३ चित्रपट प्रदर्शित झाले असून ते जगभर बाँडपट म्हणून ओळखले जातात. ह्यांमधील सर्वप्रथम चित्रपट इ.स. १९६२ सालचा डॉ. नो तर सर्वात नवा चित्रपत २०१२ सालचा स्कायफॉल हा होय. हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून ते जेम्स बाँडच्या पात्राची स्टाईल, रूबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात. आजवर सहा वेगवेगळ्या सिनेनायकांनी ह्या २३ चित्रपटांमध्ये जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारली आहे.


बाँड चित्रपट यादी[संपादन]

आजवर जेम्स बाँड शृंखलेमध्ये २३ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे सर्व चित्रपट एऑन प्रॉडक्शन्स ह्या लंडनमधील कंपनीने बनवले आहेत.

चित्रपट वर्ष अभिनेता
डॉ. नो 1962 शॉन कॉनरी
फ्रॉम रशिया विथ लव्ह 1963
गोल्डफिंगर 1964
थंडरबॉल 1965
यू ऑन्ली लिव्ह ट्वाईस 1967
ऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिस 1969 जॉर्ज लाझेन्बी
डायमंड्स आर फॉरएव्हर 1971 शॉन कॉनरी
लिव्ह अँड लेट डाय 1973 रॉजर मूर
द मॅन विथ द गोल्डन गन 1974
द स्पाय हू लव्हड् मी 1977
मूनरेकर 1979
फॉर यूवर आईज ऑन्ली 1981
ऑक्टोपसी 1983
अ व्ह्यू टू अ किल 1985
द लिव्हिंग डेलाईट्स 1987 टिमोथी डाल्टन
लायसन्स टू किल 1989
गोल्डनआय 1995 पीयर्स ब्रॉस्नन
टुमॉरो नेव्हर डाईज 1997
द वर्ल्ड इज नॉट इनफ 1999
डाय अनादर डे 2002
कॅसिनो रोयाल 2006 डॅनियेल क्रेग
क्वांटम ऑफ सोलेस 2008
स्कायफॉल 2012

ह्यांव्यतिरिक्त इतर तीन चित्रपटांमध्ये जेम्स बाँड हे पात्र नायकाच्या भुमिकेमध्ये आहे. परंतु हे चित्रपट इऑन प्रॉडक्शन्सने बनवलेले नसल्यामुळे ते अधिकृत बाँडपट मानले जात नाहीत.

  • कॅसिनो रोयाल (१९५४)
  • कॅसिनो रोयाल (१९६७)
  • नेव्हर से नेव्हर अगेन (१९८३)

बॉन्ड भूमिका सादरकर्ते[संपादन]

बाँड अभिनेते
क्रम. नाव पहिला चित्रपट अखेरचा चित्रपट संख्या
नाव प्रदर्शन तारीख वय नाव प्रदर्शन तारीख वय
1. शॉन कॉनरी डॉ. नो 5 ऑक्टोबर 1962 32 डायमंड्स आर फॉरएव्हर 14 डिसेंबर 1971 41 6
2. जॉर्ज लाझेन्बी ऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिस 12 डिसेंबर 1969 30 ऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिस 12 डिसेंबर 1969 30 1
3. रॉजर मूर लिव्ह अँड लेट डाय 27 जून 1973 45 अ व्ह्यू टू अ किल 22 मे 1985 57 7
4. टिमोथी डाल्टन द लिव्हिंग डेलाईट्स 30 जून 1987 41 लायसन्स टू किल 14 जुलै 1989 43 2
5. पीयर्स ब्रॉस्नन गोल्डनआय 17 नोव्हेंबर 1995 42 डाय अनादर डे 20 नोव्हेंबर 2002 49 4
6. डॅनियेल क्रेग कॅसिनो रोयाल 17 नोव्हेंबर 2006 38 स्कायफॉल 26 ऑक्टोबर 2012 44 3


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: