Jump to content

जेम्स बाँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेम्स बाँड (इंग्लिश: James Bond) हे ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग ह्यांनी इ.स. १९५३ साली बनवलेले एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स बाँड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये ००७ ह्या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. इयान फ्लेमिंगने बाँडवर ६ कादंबऱ्या व २ लघुकथा लिहिल्या. इ.स. १९६४ मधील फ्लेमिंगच्या मृत्यूनंतर इतर ६ लेखकांनी बाँडच्या पात्रावर आधारित कथा लिहिल्या.

जेम्स बाँड नायक असलेले आजवर २४ चित्रपट प्रदर्शित झाले असून ते जगभर बाँडपट म्हणून ओळखले जातात. ह्यांमधील सर्वप्रथम चित्रपट इ.स. १९६२ सालचा डॉ. नो तर सर्वात नवा चित्रपट २०१५ सालचा स्पेक्टर हा होय. हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून ते जेम्स बाँडच्या पात्राची स्टाईल, रुबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात. आजवर सहा वेगवेगळ्या सिनेनायकांनी ह्या २४ चित्रपटांमध्ये जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारली आहे.

बाँड चित्रपट यादी

[संपादन]

आजवर जेम्स बाँड शृंखलेमध्ये २४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे सर्व चित्रपट एऑन प्रॉडक्शन्स ह्या लंडनमधील कंपनीने बनवले आहेत.

चित्रपट वर्ष अभिनेता
डॉ. नो १९६२ शॉन कॉनरी
फ्रॉम रशिया विथ लव्ह १९६३
गोल्डफिंगर १९६४
थंडरबॉल १९६५
यू ऑन्ली लिव्ह ट्वाईस १९६७
ऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिस १९६९ जॉर्ज लाझेन्बी
डायमंड्स आर फॉरएव्हर १९७१ शॉन कॉनरी
लिव्ह अँड लेट डाय १९७३ रॉजर मूर
द मॅन विथ द गोल्डन गन १९७४
द स्पाय हू लव्हड् मी १९७७
मूनरेकर १९७९
फॉर यूवर आईज ऑन्ली १९८१
ऑक्टोपसी १९८३
अ व्ह्यू टू अ किल १९८५
द लिव्हिंग डेलाईट्स १९८७ टिमोथी डाल्टन
लायसन्स टू किल १९८९
गोल्डनआय १९९५ पीयर्स ब्रॉस्नन
टुमॉरो नेव्हर डाईज १९९७
द वर्ल्ड इज नॉट इनफ १९९९
डाय अनादर डे २००२
कॅसिनो रोयाल २००६ डॅनियेल क्रेग
क्वांटम ऑफ सोलेस २००८
स्कायफॉल २०१२
स्पेक्टर २०१५
नो टाइम टू डाय २०२०

ह्यांव्यतिरिक्त इतर तीन चित्रपटांमध्ये जेम्स बाँड हे पात्र नायकाच्या भूमिकेमध्ये आहे. परंतु हे चित्रपट इऑन प्रॉडक्शन्सने बनवलेले नसल्यामुळे ते अधिकृत बाँडपट मानले जात नाहीत.

  • कॅसिनो रोयाल (१९५४)
  • कॅसिनो रोयाल (१९६७)
  • नेव्हर से नेव्हर अगेन (१९८३)

जेम्सचे सर्व चित्रपट हे खूप चागले आहेत

बॉन्ड भूमिका सादरकर्ते

[संपादन]
बाँड अभिनेते
क्रम. नाव पहिला चित्रपट अखेरचा चित्रपट संख्या
नाव प्रदर्शन तारीख नाव प्रदर्शन तारीख
१. शॉन कॉनरी डॉ. नो ५ ऑक्टोबर १९६२ डायमंड्स आर फॉरएव्हर १४ डिसेंबर १९७१
२. जॉर्ज लाझेन्बी ऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिस १२ डिसेंबर १९६९ ऑन हर मॅजेस्टीज् सिक्रेट सर्व्हिस १२ डिसेंबर १९६९
३. रॉजर मूर लिव्ह अँड लेट डाय २७ जून १९७३ अ व्ह्यू टू अ किल २२ मे १९८५
४. टिमोथी डाल्टन द लिव्हिंग डेलाईट्स ३० जून १९८७ लायसन्स टू किल १४ जुलै १९८९
५. पीयर्स ब्रॉस्नन गोल्डनआय १७ नोव्हेंबर १९९५ डाय अनादर डे २० नोव्हेंबर २००२
६. डॅनियेल क्रेग कॅसिनो रोयाल १७ नोव्हेंबर २००६ स्पेक्टर २६ ऑक्टोबर २०१५

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: