जिवदानी देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भौगोलिक स्थान[संपादन]

विरार रेल्वेस्थानकापासून पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जिवदानी मातेचे मंदिर आहे.हा डोंगर चंदनसार, नारिंगी व विरार या गावांच्या परिसरात आहे. (१) विरारपूर्वेला नारिंगी परिरातील अन्नपूर्णाबाई तांत्रिक महाविद्यालयासमोरील पाऊलवाटेने व (२) जिवदानी रस्त्याने गडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री गणेश मंदिराकडून जाणाऱ्या सिमेंटच्या पायरी वाटेने, अशा दोन मार्गांनी गडावरील मंदिराकडे जाता येते,

शक्तिपीठाची पूर्वपीठिका[संपादन]

देवीची पूजा म्हणजे शक्तिपूजा. दक्षाने केलेल्या यज्ञात आत्माहुती केलेल्या सतीच्या कलेवराचे श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने ५१ तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी हे तुकडे पडले तेथे देवतांची शक्तिपीठे तयार झाली. भारताबाहेर नेपाळबलुचिस्तान येथेही शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रात असलेल्या १८ शक्तिपीठांपैकी जिवदानी हे एक शक्तिपीठ आहे.

पूर्वइतिहास[संपादन]

जिवदानीच्या या डोंगरावर १७ व्या शतकाच्या सुमारास जिवधन नावाचा किल्ला होता. आजही या ठिकाणी तटाच्या बांधकामाचे कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात.चिमाजीआप्पांनी हा किल्ला ३१ मार्च १७३९ रोजी जिंकून घेतला.या गडावर पांडव कालीन दगडात कोरलेल्यागुंफा ही आहेत.