जार्मो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जार्मो
जार्मो is located in इराक
जार्मो
जार्मो
जार्मोचे इराकमधील स्थान
गुणक: 35°33′00″N 44°57′00″E / 35.55000°N 44.95000°E / 35.55000; 44.95000

जार्मो हे उत्तर इराकमधील झाग्रोस पर्वतानजीक असलेले एक पुरातत्त्वीय ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी केल्या गेलेल्या उत्खननात नवाश्मयुगीन आद्य शेतकरी वसाहतीचे अवशेष उजेडात आले.

उत्खनन[संपादन]

इराकी पुरातत्त्वशास्त्रज्ञ प्रा. रॉबर्ट ब्रेडवुड यांनी जार्मो येथे इ.स. १९४८ ते इ.स. १९५५ या कालावधीत एकूण तीन सत्रांत शास्त्रीय पद्धतीने उत्खनन केले.[१] प्रा. ब्रेडवुड यांनी साधारणपणे ३ ते ४ एकराचा परिसर उत्खनित केला. या उत्खननातून मिळालेल्या वस्तूंचा कालखंड कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीने इ.स.पूर्व ७०९० ते इ.स.पूर्व ४९५० असा निश्चित करण्यात आला. याठिकाणी २५ चौरसाकृती बांधलेल्या मातीच्या घराचे अवशेष सापडले. जार्मो येथे गाय, बैल, डुक्कर, कुत्रा, गाढव यांची हाडेही सापडली. या वसाहतीत १५० लोक राहत असावेत असा निष्कर्ष प्रा. ब्रेडवुड यांनी लावला. जार्मो येथे गहूबार्ली मोठ्या प्रमाणात जळालेल्या स्वरूपात सापडल्याने येथूनच शेतीची प्रथा इतरत्र पसरली असावी असे मत मांडले जाते.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ एल.एस. ब्रेडवूड (इ.स. १९८३). "प्री-हिस्टाॅरिक आर्किॅआॅलॉजी अलाँग द झाग्रोस फ्लॅन्क्स" (इंग्रजी मजकूर). ओरिएंटल इन्स्टिट्यूट पब्लिकेशन. २८ जून इ.स. २०१३ रोजी पाहिले. 
  2. ^ रॉबर्ट ब्रेडवूड (इ.स. १९७९). "द ॲग्रीकल्चरल रिव्होल्यूशन" (इंग्रजी मजकूर). ओल्ड वर्ल्ड आर्किॅआॅलॉजी. २८ जून, इ.स. २०१३ रोजी पाहिले.