Jump to content

जायभायवाडी (धारूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जायभायवाडी (धारूर ) या पानावरून पुनर्निर्देशित)
जायभायवाडी
गाव
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा बीड
तालुका धारूर
क्षेत्रफळ
 • एकूण २.६३ km (१.०२ sq mi)
लोकसंख्या
 (2011)
 • एकूण २१३
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
भाषा
 • अधिकृत मराठी
Time zone UTC=+5:30 (भाप्रवे)
जवळचे शहर धारूर
लिंग गुणोत्तर /

जायभायवाडी हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील गाव आहे. धारूर तालुका हा बालाघाटच्या डोंगर रांगात वसलेला तालुका आहे. या तालुक्याची तीन वैशिष्ठ्ये आहेत - दुष्काळी तालुका, ऊसतोड कामगारांचा तालुका आणि गोड सीताफळांंचा तालुका. जायभायवाडी हे असेच एक दुर्लक्षित व मागास गाव आहे. आपल्या प्रयत्नांनी या छोट्या वाडीने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.[]

जायभायवाडीचे हिरेवे डोंगर

पार्श्वभूमी

[संपादन]

बीड पासून ५०  किलोमीटर अंतरावर तर धारूरपासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. गावाचे एकूण क्षेत्र  २६२.६५  हेक्टर आहे. या गावात ५५  घरे आहेत [] २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २१३ आहे. त्यातील १०७ पुरुष आणि १०६  महिला आहेत.[]

दुष्काळी परिस्थिती

[संपादन]

२०१४ व २०१५ हे दोन सलग वर्षे बीड जिल्ह्यात दुष्काळ होता.[] [] [] शेतातील नापिकी,शेतकरी आत्महत्या[], गुरांच्या दुष्काळी धावण्या व गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँँकर अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच गावांची होती.[] जायभायवाडी कमी पर्जन्यमान असल्याने हे गाव नेहमीच दुष्काळी भागात मोडते.[] कोरडवाहू शेतीवर उपजीविका होत नसल्याने गावातील लोक ऊसतोडणीसाठी जातात.[१०] [११] [१२] [१३]

दुष्काळाशी दोन हात

[संपादन]

गावातील लोकानी व ग्रामपंचायतीने गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणलोटक्षेत्र विकासाचा प्रकल्प केला. पानी फाउंडेशनतर्फे होणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१७  व २०१८ स्पर्धेत [१४] गाव सहभागी झाले होते.[१५] पानी फाउंडेशनतर्फे तांत्रिक प्रशिक्षण झाल्यावर गावाची शिवार फेरी करून कामाचे नियोजन झाले.[१६]ग्रामसभेत आगकाडी मुक्त शिवार, चराई बंदी, कुऱ्हाडबंदी असे निर्णय सामूहिकरित्या घेऊन त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. ८ एप्रिल २०१७ पासून गावाने काम करण्यास सुरुवात केली. पुढील ४५ दिवसात श्रमदान[१७] व  मशिनच्या माध्यमातून काम करून मोठा जलसाठा निर्माण करण्यात आला. प्रत्येक घरात शोषखड्डा, गावातील शिवारातील माती परीक्षण, गावाच्या प्रति माणसी ६ घनमीटर श्रमदान झाले. माथा ते पायथा पद्धतीने  गावाच्या पाणलोट क्षेत्रावर उपचार करण्यात आले. क्षेत्र उपचार म्हणून बांध बंदिस्ती, सलग समपातळीतील चर, खोल सलग समपातळीतील चर, अनगड दगडी बांध   तर पायथ्याचे उपचार म्हणून नदी खोलीकरण,शेततळी व मातीनाला बांध करण्यात आले.स्पर्धेतील गुणदानाच्या निकषानुसार काम झाले. गावात मोठा पाणी साठा तयार करण्यात आला.  गावाला यावर्षी स्पर्धेत यश मिळाले नाही परंतु गाव पाणीदार झाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न या कामाने सुटला.[१८] [१९] 

पाणलोटाचे काम झाल्यावर बहरलेली शेतं

सामाजिक संस्थांची मदत

[संपादन]

या सर्व कामात गावाने श्रमदान केले व ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाईने अवजड यंत्रांच्या द्वारे काम करण्यासाठी मदत केली.[२०] [२१] [२२] [२३] [२४] [२५]

बक्षीस

[संपादन]

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेत गावाला राज्यपातळीवरील दुसरे बक्षीस मिळाले.[२६]

सत्यमेव जयते वॉटर कप २०१८  स्पर्धेत गावाने तालुका पातळीवरील पहिले बक्षीस मिळवले.[२७] [२८]  

संदर्भ

[संपादन]
  1. ^ https://www.youtube.com/watch?v=apcGFAKefHU
  2. ^ https://villageinfo.in/
  3. ^ https://www.census2011.co.in/
  4. ^ "संग्रहित प्रत". 2020-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-01 रोजी पाहिले.
  5. ^ https://agrostar.in/amp/hi/maharashtra/article/agrostar-information-article-5bf00e3a2e7b8c499bc2a938[permanent dead link]
  6. ^ https://www.loksatta.com/vishesh-news/drought-in-india-1250439/
  7. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/beed/farmers-sucide/articleshow/48929188.cms
  8. ^ https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-situation-beed-maharashtra-19936
  9. ^ http://bepls.com/spl_2017(3)/7.pdf
  10. ^ https://www.deccanherald.com/content/501207/beed-district-witnesses-large-scale.html
  11. ^ https://www.dhan.org/developmentmatters/2014/march/case1.php
  12. ^ https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/184688/10/10_chapter%203.pdf
  13. ^ https://sg.inflibnet.ac.in/bitstream/10603/184688/10/10_chapter%203.pdf
  14. ^ "संग्रहित प्रत". 2020-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-01 रोजी पाहिले.
  15. ^ https://www.paanifoundation.in/watercup/list-of-talukas/
  16. ^ https://www.paanifoundation.in/samruddh-gaon/training-programme/
  17. ^ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/votar+kapasathi+jayabhayavadi+ekavatali-newsid-66437297
  18. ^ https://www.youtube.com/results?search_query=paani+foundation+2017
  19. ^ https://www.youtube.com/watch?v=HPBtIptKpcI&t=2152s
  20. ^ https://www.youtube.com/watch?v=ffVcUitxSjg
  21. ^ https://www.evivek.com//Encyc/2019/6/3/-dnyan-prabodhini-works-to-drought-.html
  22. ^ https://www.evivek.com//Encyc/2019/6/3/-drought-IN-Marathwada0898989.html
  23. ^ https://thelogicalindian.com/story-feed/get-inspired/satyamev-jayate-water-cup/?infinitescroll=1
  24. ^ https://www.pudhari.news/news/Marathwada/Water-Cup-Tournament-start-today/m/[permanent dead link]
  25. ^ https://www.loksatta.com/lekha-news/paani-foundation-water-cup-2018-1670228/
  26. ^ https://www.paanifoundation.in/watercup/list-of-2017-smj-water-cup-winners/
  27. ^ https://www.paanifoundation.in/watercup/list-of-2018-smj-water-cup-winners/
  28. ^ https://marathi.abplive.com/news/maharashtra/paani-foundations-satyamev-jayate-water-cup-competition-result-2018-announced-573360