जामताडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जामताडा तथा जमतारा हे भारताच्या झारखंड राज्यातील जामतारा जिल्ह्यातील एक शहर आणि जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

जामताडाला भारताची फिशिंग राजधानी असेही टोपणनाव आहे. येथून जगभरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी असंख्य फोन केले गेले. [१] एप्रिल २०१५ ते मार्च २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत, १२ भारतीय राज्यांतील पोलिसांनी सायबर गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी जामताडा येथे २३ वेळा छापे घातले. [२] फसवणूक करणाऱ्यांनी अमाप पैसा मिळवला व त्यातून आलिशान मोटरगाड्या घेतल्या आणि भव्य बंगले बनवले होते.

स्थान[संपादन]

जामताडाची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची १५५ मी (५०८ फूट) आहे व येथील गुण 23°57′N 86°48′E / 23.95°N 86.8°E / 23.95; 86.8 [३] येथे आहे.

जामताडा रांचीपासून २५० किमी तर धनबादपासून ५४ किमी अंतरावर आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Singh, Shiv Sahay (12 August 2017). "The cyber con 'artists' of Jharkhand's Jamtara district". The Hindu – www.thehindu.com द्वारे.
  2. ^ "ED raids 5 locations in Jharkhand in first cyber conning PMLA case". The Economic Times.
  3. ^ "Maps, Weather, and Airports for Jamtara, India". www.fallingrain.com.