Jump to content

जानकी अम्मल रामानुजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जानकी अम्मल रामानुजन
जन्म २१ मार्च, १८९९ (1899-03-21)
राजेंद्रम, मद्रास प्रांत
मृत्यू १३ एप्रिल, १९९४ (वय ९५)
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू
जोडीदार
अपत्ये १, (दत्तक)
वडील रंगास्वामी अय्यंगार
आई रंगनायकी अम्मल

जानकी अम्मल रामानुजन (२१ मार्च, १८९९ - १३ एप्रिल, १९९४), किंवा जानकी या भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या पत्नी होत्या. जानकीचा जन्म २१ मार्च १८९९ रोजी रंगास्वामी अय्यंगार आणि मारुदुर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या राजेंद्रम येथील रंगनायकी अम्मल यांच्या सहा मुलांपैकी चौथी मुलगी म्हणून झाला. रामानुजन आणि जानकी यांचा विवाह हा रामानुजनची आई कोमलथम्मल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. हा विवाह १४ जुलै १९०९ रोजी झाला, त्यावेळी जानकी केवळ दहा वर्षांच्या होत्या. रामानुजन यांचे वडील समारंभात सहभागी झाले नाहीत.[][]

विवाह

[संपादन]

लग्नानंतर लगेचच जानकीला कुंभकोणम येथे आणण्यात आले आणि ती तेथे काही काळ राहिली. लवकरच ती तिच्या पालकांच्या घरी परतली. इ.स. १९१२ मध्ये, वयाच्या तेराव्या वर्षी जानकी सासरी नांदायला गेल्या.[] त्यावेळेस रामानुजन 'मद्रास पोर्ट ट्रस्ट' येथे नोकरी करत होते आणि ते मद्रासमधील जॉर्ज टाऊनमध्ये राहत होते. १९१३ मध्ये, रामानुजन मद्रास विद्यापीठात संशोधन अभ्यासक म्हणून रुजू झाले आणि तरुण जोडप्याने त्यांचे निवासस्थान मद्रास मध्ये ट्रिपलिकेन येथे हलवले. १९१४ मध्ये रामानुजन इंग्लंडला रवाना होईपर्यंत ते एकत्र राहिले. रामानुजन इंग्लंडमध्ये असताना पाच वर्षांच्या काळात जानकी कुंभकोणम मध्ये रामानुजनच्या आई-वडिलांसोबत राहत होती. १९१९ मध्ये रामानुजन भारतात परतल्यावर जानकी पुन्हा एकदा मद्रास येथे त्यांच्या सोबत आल्या आणि १९२० मध्ये रामानुजन यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांच्यासोबत राहिल्या.[][][][]

रामानुजन यांच्या मृत्यूनंतर

[संपादन]

इस १९२० मध्ये रामानुजन यांच्या अकाली मृत्यूनंतर, जानकी आयकर आपल्या भावाकडे एसआर अय्यंगार यांच्याकडे राहण्यासाठी मुंबईला गेली. अय्यंगार हे तेव्हा आयुक्त असलेल्या होते. मुंबईतील वास्तव्यादरम्यान जानकीने घरी टेलरिंग आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले. त्या १९३१ मध्ये मद्रासला परत आल्या आणि स्वतःच्या बहिणीसोबत एक वर्ष आणि एक मैत्रिणींसोबत एक वर्ष राहिल्या. नंतर जानकी यांनी हनुमंथरायन कोइल गल्लीतील एका छोट्या घरात स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेतला. कपडे शिलाई करून आणि टेलरिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवला. रामानुजन यांच्या मृत्यूच्या वर्षी म्हणजे १९२० साला पासून त्यांना मद्रास विद्यापीठाकडून पेन्शनही मिळत होती. पुढील पाच दशके त्या याच घरात राहिल्या. १९५० मध्ये, त्यांची एक मैत्रीण, सौंदर्यवल्ली अचानक मरण पावली. जानकीने सौंदर्यवल्लीचा सात वर्षांचा मुलगा नारायणन यांना पुत्र म्हणून दत्तक घेतले. १३ एप्रिल १९९४ रोजी जानकी यांचे निधन झाले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Ramanujan's wife: Janakiammal (Janaki)" (PDF). Institute of Mathematical Sciences, Chennai. 10 November 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "The seamstress and the mathematician". Live mint. 20 April 2018.
  3. ^ "Ramanujan's wife: Janakiammal (Janaki)" (PDF). Chennai: Institute of Mathematical Sciences. 24 December 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 10 November 2012 रोजी पाहिले.
  4. ^ a b Berndt, Bruce C. (2001), "S. Janaki Ammaal (Mrs. Ramanujan)", in Berndt, Bruce C.; Rankin, Robert Alexander (eds.), Ramanujan: Essays and Surveys, American Mathematical Society, pp. 83–88, ISBN 9780821826249
  5. ^ a b Nandy, Pritish (2001), "Conversation: 'I didn't understand his work, but I knew its worth'", in Berndt, Bruce C.; Rankin, Robert Alexander (eds.), Ramanujan: Essays and Surveys, American Mathematical Society, pp. 89–96, ISBN 9780821826249
  6. ^ Kanigel, Robert (1991). The man who knew infinity: A life of the genius Ramanujan. New York: Washington Square Press.
  7. ^ Janardhanan, Arun (6 December 2015). "A passage to infinity". Indian Express. 5 September 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 September 2016 रोजी पाहिले.