जागतिक महासागर दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जागतिक महासागर दिन जगभर ८ जून रोजी पाळला जातो. २००८ सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. त्यापूर्वी १९८२ सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. केनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था,मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या संस्था ; अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात. [१]

आर्क्टिक महासागरातील हिमनग

हेतू[संपादन]

जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे मजत्व जपले जावे असा यामागे हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन,अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते.

२०१८ चे ध्येय[संपादन]

प्लॅस्टिकपासून महासागरांचे रक्षण करणे असे ध्येय २०१८ वर्षासाठी संस्थेकडून निश्चित करण्यात आले आहे.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "World Ocean Day".
  2. ^ "World Oceans Day 8 June".