जाईबाई चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जाईबाई चौधरी (२ मे १८९२ - ????) ह्या पहिल्या दलित महिला शिक्षिका- मुख्याध्यापक, लेखक, वक्त्या आणि दलित स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या होत्या. २ मे १८९२ रोजी नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड गावातील महार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जाईबाईंचा प्रवास रेल्वेस्टेशनवर सामान उचलणारी हमाल ते शिक्षिका ते दलित चळवळीतल्या कार्यकर्त्या असा झाला.[१][२][३][४]

जाईबाई जुलै १९४२ मध्ये झालेल्या "अखिल भारतीय दलित महिला परिषदे"च्या सदस्याही होत्या. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते. या परिषदेतील महिलांची जागरूकता पाहून बाबासाहेबांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाले - या परिषदेत मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग पाहून आपण प्रगती केली याचा मला दिलासा व आनंद झाला आहे.[५]

सावित्रीबाई फुलेफातिमा शेख यांच्यासारख्या जाईबाई देखील दलित मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या एक प्रणेत्या मानल्या जातात. त्या रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करत असे. त्या शिक्षिका झाल्या, त्यानंतर मुख्याध्यापक आणि दलित कार्यकर्त्या बनून दलितांच्या हक्कांसाठी आवाज उठविला.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जाईबाई चौधरी : पहिल्या दलित महिला मुख्याध्यापक आणि दलित स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या". BBC News मराठी. 2021-07-09. 2021-07-10 रोजी पाहिले.
  2. ^ "महिला कुली जिन्होंने 1938 में किया था दलित महिलाओं का बड़ा सम्मेलन". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2021-07-09. 2021-07-10 रोजी पाहिले.
  3. ^ "नारी शक्ति! जाईबाई चौधरी एक ऐसी सशक्त महिला जो कुली, फिर टीचर और बाद में दलितों की बुलंद आवाज़ बनीं". punjabkesarinari. 2021-07-09. 2021-07-10 रोजी पाहिले.
  4. ^ "दलित समाज की महान समाज-सुधारिका "जाईबाई चौधरी", जिसको समाज कभी नहीं भुला सकता - Velivada - Educate, Agitate, Organize". Velivada (इंग्रजी भाषेत). 2017-07-15. 2021-07-10 रोजी पाहिले.
  5. ^ "दलित समाज की महान समाज-सुधारिका "जाईबाई चौधरी", जिसको समाज कभी नहीं भुला सकता - Velivada - Educate, Agitate, Organize". Velivada (इंग्रजी भाषेत). 2017-07-15. 2021-07-11 रोजी पाहिले.
  6. ^ "दलित समाज की महान समाज-सुधारिका "जाईबाई चौधरी", जिसको समाज कभी नहीं भुला सकता - Velivada - Educate, Agitate, Organize". Velivada (इंग्रजी भाषेत). 2017-07-15. 2021-07-11 रोजी पाहिले.