फातिमा शेख
फातिमा शेख | |
---|---|
जन्म |
फातिमा शेख ९ जानेवारी १८३१ पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा |
|
ख्याती | पहिल्या मुस्लिम स्री शिक्षकांपैकी एक |
धर्म | इस्लाम |
नातेवाईक | मियां उस्मान शेख (भाऊ) |
फातिमा शेख या एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होत्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी होत्या. शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्याचे काम केले.[१][२]
मियां उस्मान शेख या त्यांच्या भावाच्या घरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी वास्तव्य केले होते. फातिमा शेख यांच्यासह ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली.
अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली.[३] फुलेंनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले. १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत शेख यांनी भाग घेतला.[३]
९ जानेवारी २०२२ रोजी, गुगलने फातिमा यांना १९१ व्या जयंतीनिमित्त डूडलद्वारे सन्मानित केले.[४][५]
प्रारंभिक जीवन
[संपादन]शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ साली पुण्यात झाला. मियां उस्मान शेख हे त्यांचे भाऊ होते.
कार्य
[संपादन]अमेरिकन शिक्षक प्रशिक्षण संस्थेत त्यांची भेट सावित्रीबाई फुलेंशी झाली. १८४८ साली पुण्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. ही शाळा सुरू केल्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घर सोडावं लागलं होतं, त्यावेळी त्यांनी शेखच्या घरी वास्तव्य केले. फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्यानं शिक्षणाच्या कामाला सुरुवात केली. त्यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले.
शेख यांनी आयुष्यभर समतेसाठी काम केलं. त्यांनी दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं. फातिमा शेख यांनाही सावित्रीबाई फुले यांच्या प्रमाणे त्याकाळातील लोकांकडून त्रास झाला.
शेख यांनी सत्यशोधक समाजाच्या कामात देखील सहभागी होत्या.
इतर माहिती
[संपादन]१० ऑक्टोबर १८५६ रोजी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना लिहलेल्या पत्रामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख केला होता. सावित्रीबाई यांनी स्वतःच्या तब्येतीविषयी ते पत्र लिहिले होते. पत्रात सावित्रीबाई फुले म्हणतात, "फातिमाला त्रास पडत असेल पण ती कुरकूर करणार नाही."[२]
सन्मान
[संपादन]- २०१४ भारत सरकारने फातिमा शेख यांच्यांवरील धडा आणि छायाचित्र उर्दू पुस्तकांमध्ये समाविष्ट केला होता.
- ९ जानेवारी २०२२ रोजी, गुगलने फातिमा यांना त्यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त डूडलद्वारे सन्मानित केले.[६]
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Tharu, Susie J.; Lalita, Ke (1991). Women Writing in India: 600 B.C. to the early twentieth century (इंग्रजी भाषेत). Feminist Press at CUNY. ISBN 978-1-55861-027-9.
- ^ a b "Fatima Sheikh social reformer : गुगलकडून महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षिकेला जयंती निमित्त अभिवादन, फातिमा शेख कोण होत्या?". TV9 Marathi. 2022-01-09. 2022-01-09 रोजी पाहिले.
- ^ a b Empire, Civil Society, and the Beginnings of Colonial Education in India (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. 2019-05-23. ISBN 978-1-108-65626-9.
- ^ "Fatima Sheikh's 191st Birthday". www.google.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-09 रोजी पाहिले.
- ^ "Google honours educator, social reformer Fatima Sheikh with a doodle". Newsd.in (इंग्रजी भाषेत). 2022-01-09 रोजी पाहिले.
- ^ "Google doodle celebrates educator, feminist icon Fatima Sheikh's 191st birthday". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-01-09. 2022-01-09 रोजी पाहिले.