छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखातील काही मूळ उतारे विकिस्रोत या बंधुप्रकल्पात स्थानांतरित केले जातील तर काही उतारे कॉपीराईट संदिग्धतेमुळे वगळले जातील


छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेली ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. याती बहुतांशी पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे; तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतिपर लिखाणे ही विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात.

शिवाजीमहाराजांवरील ललित साहित्य[संपादन]

शिवाजीच्या जीवनावरील नाट्येतर ललित साहित्यकृती[संपादन]

 • आग्ऱ्याहून सुटका (पु.बा. गोवईकर)
 • आज्ञापत्र : रामचंद्रपंत अमात्य
 • सभासदाची बखर : कृष्णाजी अनंत सभासद
 • एक्याण्णव कलमी बखर : (संपादक)वि.स.वाकसकर
 • शिवछत्रपतींचे चरित्र : मल्हार रामराव चिटणीस
 • राजा शिवाजी (खंडकाव्य) : म.म.कुंटे
 • शिवराय (खंडकाव्य) : कवी यशवंत
 • उष:काल (कादंबरी) : ह.ना. आपटे
 • गड आला पण सिंह गेला (कादंबरी) : ह.ना. आपटे)
 • श्रीमानयोगी (कादंबरी) : रणजित देसाई
 • कुलरक्षिता जिऊ (पुस्तक - लेखिका : वैशाली फडणीस)
 • कुळवाडीभूषण शिवराय (पुस्तक - लेखक : श्रीकांत देशमुख)
 • छत्रपती शिवरायांचे कष्टकरी मावळे (पुस्तक - लेखक : दत्ता नलावडे)
 • छत्रपती शिवाजी (चरित्र, निनाद बेडेकर)
 • थोरलं राजं सांगून गेलं (निनाद बेडेकर)
 • रणसंग्राम (मूळ इंग्रजी 'फ्रॉंटियर्स' लेखिका मेधा देशमुख भास्करन; मराठी अनुवादक - नंदिनी उपाध्ये) (शिवाजी आणि औरंगजेब यांच्या जीवनातील समकालीन प्रसंगांवर आधारलेली कादंबरी)
 • शिवछत्रपती (पटकथा, लेखक - शिरीष गोपाळ देशपांडे)
 • शिवनामा (काव्य, कवी - मुबारक शेख)
 • शिवभूषण (निनाद बेडेकर)
 • छत्रपती शिवाजी आणि सुराज्य (लेखक - भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल दवे)
 • पॅटर्न शिवरायांचा (प्रा. सतीश कुमदाळे)
 • राजा शिवछत्रपती (लेखक बाबासाहेब पुरंदरे). - १६हून अधिक आवृत्त्या.

शिवाजीच्या जीवनाचे अंग दाखविणारी नाटके/चित्रपट[संपादन]

 • ’आग्ऱ्याहून सुटका’ (नाटक, लेखक विष्णू हरी औंधकर (१९२०च्या सुमारास)
 • छत्रपती शिवाजी आणि २१वे शतक - व्याख्याते डॉ. गिरीश जखोटिया(२०१३)
 • जाहले छत्रपती शिवराय (महानाट्य : लेखक व दिग्दर्शक सुदाम तरस) (२०१३)
 • तीर्थ शिवराय (रंगमंचीय संगीतमय कार्यक्रम, गीते - डॉ. निखिल पाठक. संगीत - जीवन धर्माधिकारी)
 • बेबंदशाही (नाटक, विष्णू हरी औंधकर (१९२०च्या सुमारास)
 • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (इ.स. २००९) (चित्रपट - कथा/पटकथा महेश मांजरेकर)
 • भालजी पेंढारकरांचे अनेक चित्रपट (’गनिमी कावा’, "छत्रपती शिवाजी', "थोरातांची मंजुळा’, ’नेताजी पालकर’, ’बहिर्जी नाईक’, "बालशिवाजी’, "मराठा तितुका मेळवावा', "महाराणी येसूबाई’, "मोहित्यांची मंजुळा', "स्वराज्याचा शिलेदार', वगैरे)
 • राजे आणि छत्रपती - लेखक शिवा बागुल (सप्टेंबर २०१४)
 • रायगडाला जेव्हा जाग येते - नाटक, लेखक वसंत कानेटकर (३-३-२०१३ पर्यंत २४२५ प्रयोग)
 • लाल महालातील थरारक शिव तांडव (महानाट्य -प्रमुख भूमिका अमोल कोल्हे)
 • शहाशिवाजी - लेखक य.ना. टिपणीस (१९२०च्या सुमारास)
 • शिवगर्जना (महानाट्य : लेखक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत) (२०१२)
 • शिवरायांचे आठवावे रूप’ (महानाट्य- लेखक ऋषिकेश परांजपे).
 • शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक : लेखक राजकुमार तांगडे) (२०१३)
 • शिवाजीच्या जीवनावरील ॲनिमेशनपट (हिंदी आणि मराठी) - अझहर खान यांच्या ’अमन अनम फिल्म प्रॉडक्शन’ची निर्मिती (ऑगस्ट २०१३)

सांस्कृतिक प्रभाव[संपादन]

शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषेत प्रकाशित झाल्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेली ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. यातील बहुतांशी पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे. तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतीपर लिखाणे विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात.

सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांचा पोवाडा लिहिला. लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवजयंती या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली.

शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती

ललित साहित्यातील मिथक अभ्यास[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

समकालीन ते छत्रपती शाहूराजे संभाजी भोसले कालखंड[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

छत्रपती शाहूराजे संभाजी भोसले उत्तर कालखंड ते १८१८[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

१८१९ ते उर्वरित १९वे शतक[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांचा पोवाडा लिहिला.

१९०१ ते १९४७[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवाजीच्या जयंतीनिमित्त ’शिवजयंती’ या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती.


१९४७ ते २०००[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ’राजा शिवछत्रपति’ या हजारपानी चरित्रग्रंथाची आतापर्यंत अनेक पुनर्मुद्रणे झाली आहेत. त्याच पुस्तकावर आधारलेले ’जाणता राजा’ हे मोठ्या मैदानावर आणि फिरत्या रंगमंचावर दाखविले जाणारे महानाट्य आहे.

२००० ते २०१४[संपादन]

२४ नोव्हेंबर २००८ पासून शिवाजीच्या जीवनावर आधारित नितीन देसाई यांनी दिग्दर्शित केलेली राजा शिवछत्रपती ही मालिका दूरचित्रवाणीच्या स्टार प्रवाह या वाहिनीवर चॅनेलवर दाखवली गेली.

शिवकल्याण राजा[संपादन]

समर्थ रामदास यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान व युगप्रवर्तक असे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण, आशयघन व वजनदार अशा शब्दांत तोलले आहे. छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या व कार्यकर्तृत्वाच्या प्रत्येक पैलूचा उल्लेख शिवकल्याण राजा या कवनात केलेला आहे.[१]

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।

धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।

देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण। हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलिया ||

भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।

कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला । कित्येकाला आश्रयो जाहला

।शिवकल्याण राजा।

आनंदवनभुवनी[संपादन]

शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे ‘आंनदवनभुवन’ च निर्माण केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दांत केले आहे. हे काव्य म्हणजे छत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय.[१]

स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही।आनंदवनभुवनी।।

त्रैलोक्य चालील्या फौजा, सौख्य बंध विमोचने, मोहीम मांडिली मोठी।आनंदवनभुवनी।।

येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमे , संतोष मांडला मोठा।आनंदवनभुवनी।।

भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, भक्तासी दिधले सर्वे।आनंदवनभुवनी।।

येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे।आनंदवनभुवनी ।।

उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, जप-तप अनुष्ठानेआनंदवनभुवनी।।

बुडाली सर्वही पापे, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला।

आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।

संदर्भ[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराज

 1. a b ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना संकेतस्थळ: http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=1&id=90 )