Jump to content

चेटूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



जगभरात आदिम कालापासून परानिष्ट म्हणजे दुसऱ्याचे वाईट करणे या हेतूने काळी जादू अथवा चेटूक विविध स्वरूपात प्रचलित आहे .मुख्यत:ज्या शत्रूवर प्रत्यक्ष हल्ला करून त्याला नेस्तनाबूत करता येत नसेल ,अशा वेळी काळी जादू वापरली जाते.या प्रकारामध्ये मुख्यत्वेकरून मृतात्मे आणि दुष्टात्मे यांचे सहाय्य घेतले जाते. तांत्रिक-मांत्रिक हे स्मशानातील वाईट शक्तींना प्रसन्न करून घेऊन त्यांना विशिष्ट काम करायला सांगतात.त्यावेळी बक्षिस म्हणून त्या दुष्ट शक्तीला काही बळी किंवा त्याचे आवडते खाद्य दिल्या जाते.[ संदर्भ हवा ]


व्हूडू ,भानामती, बंगाली जादू , शटकर्म,दश महाविद्या इत्यादी नावांनी ओळखली जाणारा हा प्रकार भारतात पुराणकाळापासून प्रचलित आहे ,त्याला वामाचारी तंत्र-मार्ग असे म्हणतात.या मार्गामध्ये मूठ मारणे ,जारण,मारण,उच्चाटन ,वशीकरण ,संमोहन ,वाचाबंधन, बुद्धीस्तंभन , स्तंभन, मध्य-प्रेमी उच्चाटन इत्यादी अनेक उप-प्रकार आहेत.[ संदर्भ हवा ]अश्या प्रकारची कामे करणाऱ्या व्यक्तिंना मांत्रिक म्हणतात.

याशिवाय काही पुण्यचोर ENERGY VAMPIRES & BLOOD VAMPIRES[मराठी शब्द सुचवा] ,ECTOPLASM ATTACKERS[मराठी शब्द सुचवा] इत्यादी शक्तीहि असून त्या निष्पाप सामान्य माणसांची जीवन-उर्जा किंवा जीवन-द्रव्य पळवून नेतात ,त्यामुळे पीडित व्यक्ती निस्तेज/दुःखी आणि निराश आयुष्य जगते.हे बहुदा रक्तपिपासू असतात.तसेच दुष्ट आत्म्यांच्या प्रभावामुळे, त्यांची वंशावळी वाढविण्याचा, इतर चांगल्या लोकांना आपल्यासदृष्य बदलविण्याचा ती व्यक्ति भरपूर प्रयत्न करते.[ संदर्भ हवा ]

सूर्य मावळल्यावर अश्या प्रकारच्या कामांना गती येते.या प्रकारची कामे सहसा रात्रीच करण्यात येतात.मध्यरात्रीची वेळ अश्या कामांना उपयुक्त असते असा समज आहे.अमावास्या पौर्णिमा वगैरे तिथी किंवा विशिष्ट दिवस जसे पिठोरी अमावस्या, पितृमोक्ष अमावस्या आदि उपयुक्त समजण्यात येतात.[ संदर्भ हवा ]