कँटोनीज भाषा
Appearance
(कॅंटोनीज भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅंटोनीज | |
---|---|
चिनी: 廣東話 | |
कॅंटोनीज अक्षरे - जुन्या लिपीमध्ये (डावीकडे) व नव्या चिनी लिपीमध्ये (उजवीकडे) | |
स्थानिक वापर | चीन, हाँग काँग, मकाओ |
प्रदेश | चीनचा क्वांगतोंग प्रांत |
लोकसंख्या | ८ कोटी |
भाषाकुळ | |
लिपी | चिनी लिपी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
हाँग काँग मकाओ |
भाषा संकेत | |
ISO ६३९-३ | yue |
कॅंटोनीज ही चिनी भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा आहे. ह्या भाषेचा उगम चीनच्या आग्नेय भागातील क्वांगचौ ह्या भागात झाला व आजच्या घडीला क्वांगतोंग प्रांतामधील मोती नदी खोऱ्यात राहणाऱ्या तसेच हाँग काँग व मकाओ ह्या प्रदेशांमधील सुमारे ८ कोटी लोक कॅंटोनीज भाषा वापरतात. त्याचबरोबर आग्नेय आशियामधील सिंगापूर, मलेशिया, व्हियेतनाम, कंबोडिया इत्यादी देशांमध्ये देखील कॅंटोनीज भाषिक आढळतात.
कॅंटोनीज आणि मॅंडेरिन ह्या चिनी भाषांमध्ये अनेक शब्द जरी समान असले तरीही व्याकरणाच्या बाबतीत ह्या भाषा पूर्णपणे वेगळ्या मानल्या जातात.
संदर्भ
[संपादन]