चिखलवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?चिखलवाडी
भारत

१६° ५६′ २४″ N, ७४° ०८′ २४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
संकेतस्थळ: http://sangli.gov.in/

गुणक: 16°56′40″N 74°08′21″E / 16.9445043°N 74.1391755°E / 16.9445043; 74.1391755{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. चिखलवाडी हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मोरणा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. गावाच्या उत्तरेला पवारवाडी हा चिखलवाडीचाच एक भाग आहे .

गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची शाळा आहे.

गावात भैरवनाथाचे देऊळ आहे. त्या मंदिराबाहेर जवळजवळ (केव्हा पासून?)200 वर्षांपूर्वीची गोरखचिंचेची व वडाची झाडे आहेत. गावाच्या प्रवेशालाच भैरवनाथाच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. दरवर्षी अक्षय तृतीयेला गावात भैरवनाथाची यात्रा भरते. दसऱ्याला भैरवनाथाचा पालखी सोहळा असतो.

गावाच्या दुसऱ्या टोकाला आई निनाईचेच मंदिर आहे. हे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले सधन गाव आहे. अंगाई हा मराठी सुपरहिट सिनेमाचे बरेच चित्रीकरण या गावात झाले आहे.

गावात कर्ले, पवार, सावंत, वाठारकर, देसाई, मोरे, शिंदे, खवरे, पायमल, मांडे या आडनावाचे लोक आहेत.