चिंदविन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चिंदविन नदी (बर्मी भाषा: ချင်းတွင်းမြစ်) म्यानमारमधील प्रमुख नदी आहे. ही नदी इरावती नदीची सगळ्यात मोठी उपनदी आहे. मणिपुरी लोक या नदीला निंग-थी म्हणून ओळखतात. हीचा उगम म्यानमारच्या कचिन राज्यातील हुकॉंग खोऱ्यात आहे. तनाई, ताब्ये, तवान आणि तारोन नद्यांच्या संगमापासून चिंदविन नदी सुरू होते. मुखापासून होमालिन शहरापर्यंत यात मोठ्या नौका ये-जा करतात.