चर्चा:हिरण्यकश्यपू

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष हे दोघे भाऊ होते; एकाच व्यक्तीची ही दोन नावे नाहीत. आणि हिरण्यकशिपू राक्षस किंवा दैत्य नव्हता, तो असुर होता, म्हणजे माणूस होता. तो भारतवर्षातल्या त्रिगर्त राज्यातील मुलतान शहरात राहत होता. तिथलाच तो राजा असावा. (मुलतान आता पाकिस्तानात आहे). विष्णूने वराह अवतारात हिरण्याक्षाचा (भावाचा) वध केल्यामुळे हिरण्यकशिपू विष्णूचा द्वेष करू लागला. हिरण्यकशिपूला दोन बायका असल्या, तरी त्याचे ध्रुवावर प्रेम होते. त्याला तो मांडीवर घेऊन बसला असताना ध्रुवाच्या सावत्र आईने त्याला खाली ढकलले, हिरण्यकशिपूने नाही!.... (चर्चा) २१:१७, २ मे २०१५ (IST)Reply[reply]

  आणि 'विष्णू किंवा श्री हरी' 'क्षत्रीयाद्य' नव्हता. विष्णू जर क्षत्रिय असेल तर वराह म्हणजे डुक्कर हेसुद्धा क्षत्रिय असले पाहिजे. नृसिंह हा पूर्णपणे विकसित न झालेला मानव होता. .... (चर्चा) २१:२६, २ मे २०१५ (IST)Reply[reply]


  @: आपल्या उपरोक्त मांडणीत प्रथम दर्शनी तार्कीक उणीव असण्याची शक्यता वाटते. तार्कीक उणीवेचा नेमका प्रकार सांगीतला जाण्यासाठी विकिपीडिया:तर्कशास्त्र या प्रकल्पांतर्गत तार्कीक उणीवांबद्दलचे अधीक लेखन होणे गरजेचे आहे.
  मी आपला मुद्द्यातील उणीवा विस्ताराने दाखवू इच्छित नाही कारण मूलत: अशी चर्चा विकिपीडियाच्या कक्षेत किती बसू शकेल या बद्दल साशंकता आहे.
  विकिपीडियाच्या दृष्टीने अबकड व्यक्तीबद्दल हळक्षज्ञ हे विशेषण/उपाधी दिले असेल तर, १) ते लेख शिर्षकात असू नये २) ती ज्ञानकोशात लिहिणाऱ्या लेखक/संपादकाचे व्यक्तीगत मत असू नये म्हणजे तिसरा पडताळण्या जोगा संदर्भ हवा.
  ३) 'कखगघ' यांनी अबकड व्यक्तीबद्दल हळक्षज्ञ हे विशेषण/उपाधी दिली आणि हा पडताळण्या जोगा संदर्भ आणि हि विश्वकोशीय उल्लेखनीयता. विकिपीडियाच्या दृष्टीने येथे मामला संपतो. अबकड व्यक्ती खरोखरच संत, महात्मा, लोकमान्य इत्यादी पदव्या/उपाध्यांना पात्र आहे अथवा नाही हे विकिपीडियातील लेखक/संपादकांच्या व्यक्तीगत मतावर अवलंबून असणे अभिप्रेत नाही असे वाटते.
  माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:५१, २४ मे २०१५ (IST)Reply[reply]