Jump to content

चर्चा:स्‍कूल ऑफ फाईन आर्ट्स (इंदूर)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ह्या लेखाच्या मथळ्यातला ’आर्ट्‌स हा शव्द बदलून ’आर्ट्स’ करण्याचा काय हेतू आहे? मूळ शब्दाला बदलवून तयार झालेल्या या नव्या शब्दाचा उच्चार आ ट्‌ + र्‌ स असा होईल. ’ट’च्या खाली जे पाय मोडायचे चिन्ह आहे त्याला मराठी सोडून अन्य भारतीय भाषांत ’विराम चिन्ह’ म्हणतात. जेव्ही जेव्हा हे चिन्ह दिसेल तेव्हा किंचित यती (विराम) घेऊन पुढचे अक्षर उच्चारावे असा हेतू असतो.

क्वचित काही ठिकाणी, मराठी शब्दोचारात एक नैसर्गिक यती असतो, तेथे हे चिन्ह वापरता येते. उदा० उद्‌घाटन, वाङ्‌मय हे शब्द उच्चारताना द्‌ किंवा ङ्‌ नंतर किंचित थांबावेच लागते, म्हणून हे लिखाण शुद्ध समजले जाते. सन्‌त, विद्‌यालय, बालोद्‌यान असे लिखाण निखालस चुकीचे आहे. या शब्दांचे उच्चार अनुक्रमे सन्‌ त, विद्‌ यालय, बालोद्‌ यान (हे कुठले यान?) असे आणि असेच होतात. असे उच्चारण अभिप्रेत नाही आणि त्यामुळे असे लिखाणही उचित नाही. ...... (चर्चा) १७:१४, ६ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]

लेख आर्टस शीर्षकाखाली होता. आर्टस चुकीचे आहे.
अभय नातू (चर्चा) ०७:१७, ७ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]