Jump to content

चर्चा:सिद्धान्तशिरोमणी

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला वाटते सिद्धान्तशिरोमणी असे शुद्धलेखन बरोबर आहे. तज्ज्ञांनी कृपया आपले मत द्यावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २३:०५, १० डिसेंबर २०१३ (IST)Reply

सिद्धान्तच बरोबर

[संपादन]

मराठीमध्ये सिद्धांत म्हणजे अनेक सिद्ध पुरुषांत, देहांत म्हणजे अनेक शरीरांत, वृतांत म्हणजे अनेक बातम्यांत, वगैरे. त्यामुळे थिअरी या अर्थाचा शब्द सिद्धान्त असा, मृत्यू या अर्थाचा देहान्त असा, आणि हकीकत या अर्थाचा शब्द वृत्तान्त असाच लिहावा, असे मराठी शुद्धलेखनाचा नियम क्रमांक १ सांगतो.

असे आणखी काही शब्द : अर्थान्त=अर्थाचा शेवट; प्रत्ययान्त=शेवटी प्रत्यय जोडलेला (शब्द); युगान्त =(युगाचा अंत); वेदान्त (वेदग्रंथांच्या शेवटी शेवटी सांगितलेले तत्त्वज्ञान); व्यंजनान्त (शेवटी व्यंजन असलेला शब्द-हलन्त शब्द); शालान्त (शालाजीवनातील शेवटची-परीक्षा, वगैरे); शोकान्त(ज्याचा शेवट दु:खी असतो अशी कथा, नाटक वगैरे); सत्रान्त (सत्राच्या-सेमिनारच्या शेवटी); सुखान्त (ज्याचा शेवट सुखावह ते); स्वरान्त (ज्या शब्दाच्या शेवटी स्वर असतो असे शब्द), हलन्त (ज्या शब्दाच्या शेवटी हल्‌ म्हणजे व्यंजन असते असा शब्द किंवा असे अक्षर-पायमोडके अक्षर).

कृतांत (=यम); भाषांतर (मजकुराचे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करणे), रूपांतर, गंडांतर असले शब्द, आणि सप्तमीचा ’त’, ’आत’ किंवा ’आंत’ हा प्रत्यय लागलेले शब्द मराठीत लिहिताना अनुस्वारच वापरावा, न्त लिहू नये.

संस्कृतमध्ये सप्तमीचे ’त’,’आंत’ किंवा ’आंत’ हे प्रत्यय नाहीत. त्यामुळे संस्कृत शब्द लिहिताना ’न्त’ लिहिणेच आवश्यक असते. ’सिद्धान्तशिरोमणि’ हा संस्कृत शब्द असल्याने त्यावे लिखाण संस्कृतमध्ये ’सिद्धान्तशिरोमणि’ असेच हवे, मराठीत मात्र त्यातला ’णी’ दीर्घ होईल.”’J (चर्चा) ००:२६, ११ डिसेंबर २०१३ (IST)Reply

सहज सुचल म्हणून "सिद्धान्तशिरोमणि" हे संबंधीत ग्रंथाचे विशेषनाम असल्यामुळे नावाचे मूळस्वरूप जपण्यासाठी शीर्षकातला 'णि' ऱ्हस्व नको का ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:४४, ११ डिसेंबर २०१३ (IST)Reply