चर्चा:सक्रिय दीर्घिकीय केंद्रक
‘सक्रिय दीर्घिकीय केंद्रक’मध्ये दीर्घिका सक्रिय आहे की केंद्रक? जर र्केंद्रक असेल तर शब्दरचना ’दीर्घिकेचे सक्रिय केंद्रक’ अशी पाहिजे. जर दीर्घिका सक्रिय असेल तर ’सक्रिय दीर्घिकेचे केंद्रक’ ही शब्दरचना अधिक योग्य वाटते.. Galactic'चे ’दीर्घिकीय’ असे शब्दशः भाषांतर करायची गरज नाही. याशिवाय, सक्रिय शब्दाऐवजी ’जिवंत हा शब्द अधिक सोपा आणि तितकाच अर्थवाही आहे, तो वापरल्यास ’जिवंत दीर्घिकेचे केंद्रक’ अशी शब्दरचना होईल, ती वाचकांना भावेल. ... ज (चर्चा) १४:०३, २१ जानेवारी २०१६ (IST)
जवळपास प्रत्येक दीर्घिकेला केंद्रक असते. ते सक्रिय असेल तर त्या दीर्घिकेला सक्रिय दीर्घिका म्हणतात. ’दीर्घिकेचे सक्रिय केंद्रक’ हे शीर्षक एखाद्या विशिष्ट दीर्घिकेबद्दल आहे की काय असं मला वाटतं. सद्य शीर्षक मला एक जनरल शीर्षक वाटतं. शब्दशः भाषांतर करायची गरज नाही हे मान्य आहे, पण इतर भाषांतरं मला कमी योग्य वाटली म्हणून मी तसं केलं. इथे सुचवलेल्या शीर्षकांची इंग्रजी भाषांतरं active galaxy's nucleus किंवा active nucleus's galaxy ऑड वाटतात. आणि जिवंत हा जरी सारख्याच अर्थाचा आणि सोपा शब्द असला तरी मला सक्रिय शब्द जिवंतपेक्षा जास्त समर्पक वाटतो. हे शीर्षक योग्य वाटत नसेल तर बदलावे. पण एकदा बनवलेल्या पानाच्या शीर्षकात बदल करता येतो का? की प्रत्येक वेळी नवीन पान बनवून जुने पान नवीन पानाकडे पुनर्निर्देशित करावे लागते?
--प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १९:३६ २१ जानेवारी २०१६ (IST)
- पानाच्या शीर्षकात बदल करता येतो. पानाच्या वरील भागात अधिक वर टिचकी दिली असता स्थानांतरण असा दुवा दिसेल. त्याद्वारे लेखाचे पुनर्नामकरण करता येते.
- अभय नातू (चर्चा) २०:००, २१ जानेवारी २०१६ (IST)
केंद्रक सक्रिय असेल तर दीर्घिका सक्रिय, हे जर सर्वज्ञात असेल तर दीर्घिकेचे सक्रिय केंद्रक किंवा सक्रिय दीर्घिकेचे केंद्रक अश्या दोन्ही शब्दरचना चालाव्यात. सर्वज्ञात नसेल तर सक्रिय दीर्घिकेचे सक्रिय केंद्रक अशी रचना करावी लागेल. मुळात दीर्घिकीय हा शब्द वापरायची गरज आहे? ‘दीर्घिकेचे’ म्हणण्यात काय नुकसान आहे? आणि Active दीर्घिका म्हणजे काय, तर जी सुप्त नाही ती. मग Activeसाठी सजग (जागी असलेली) हा शब्द काय वाईट आहे? Active म्हणजे मृत नाही असा अर्थ असेल तर, जिवंत (किंवा सचेतन) हे शब्द अधिक योग्य वाटतात.
मराठी वाक्यरचनांची शब्दश: केलेली इंग्रजी भाषांतरे अनेकदा ऑड वाटतात, म्हणूनच इंग्रजीचे मराठी भाषांतर करून त्याचे परत इंग्रजी भाषांतर केले तर तेच उत्तर मिळत नाही. त्यामुळे अशी ऑड वाटणारी इंग्रजी भाषांतरे करूच मयेत..
अर्थात, मी खगोलशास्त्रज्ञ नाही, त्यामुळे प्रथमेश ताम्हाण्यांना पटत नसेल असा कुठलाही बदल मी करू इच्छित नाही. .... ज (चर्चा) २२:४४, २१ जानेवारी २०१६ (IST)