चर्चा:महिपती ताहराबादकर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
Untitled
[संपादन]महाराज विठ्ठल भक्त होते त्यामुळे विठ्ठलाचे वर्णन करताना ते म्हणतात -
'विठु पंढरीच्या रामा ! जन्मा आलो किर्ति गाया !!
धन्य देखिली पंढरी ! पाय तुझे विटेवरी !!
सलगी केली गा संतासी ! सुख वाटले जीवासी !!
सुखी नाम गाय keeर्ति ! दास तुझा महिपती !!
न लगे मुक्ति न लगे भुक्ति ! मागत नाही धनसंपत्ती !!
तुझ्या दासांची वर्णीन किर्ति ! हेचि महिपती मागत !!
कोणी मागितले सायुज्य सदन ! कोणी मागितले वैकुंठ भवन !!
माझे हेचि इच्छितसे मन ! जे गुण वर्णीन संतांचे !!
(भक्तविजय)
[संपादन]या चरित्रामध्ये लेखकाने महिपती महाराज यांचे बालपण,विवाह,तुकोबारायांचा स्वप्नातील दृष्टांत,दिंडी वारीतील महाराजांचे अनुभव कथन केले आहेत. चरित्राचे वर्णन करताना संत तुकाराम, एकनाथ, ज्ञानदेव या वारकरी संप्रदायातील संतांचे अनेक दाखले,ओव्या गुंफल्या आहेत. लेखक स्वत: कीर्तनकार व प्रवचनकार आहेत त्यामुळे त्यांच्या लेखणीवर संत साहित्याचे संस्कार प्रकर्षाने जाणवतात. महिपती महाराजांच्या काही चमत्कारांचा उल्लेख चरित्रात आढळतो. संतांनी त्यांच्या हयातीत अंधश्रद्धा, भेदाभेद दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यांच्या भक्तांनी अत्यंतिक भक्तिभावाने त्यांच्या चमत्कारांचे व दंतकथेचे माहात्म्य वर्णन केले आहे. संतांच्या बद्दल असलेल्या अगाढ श्रद्धेमुळे गुणवर्णनात अतिशयोक्ती व चमत्कारांचे वलय निर्माण होत असते. प्रस्तुत चरित्र लिहिताना हा मोह लेखकाला आवरता आलेला नाही हे साहजिक आहे. संत चरित्र लिहण्यामागची महिपती महाराजांची भूमिका व त्यांनी घेतलेले कष्ट यावर अधिक प्रकाश पाडला पाहिजे.
महिपती महाराजांचे वर्णन करताना पायात चाळ, खांद्यावर वीणा, डाव्या हातात चिपळ्या, व पायी घुंगरू असे वर्णन केलेले आहे. तसे त्यांचे जुने चित्र सुद्धा प्रकाशित केले असते तर फारच उत्तम काम झाले असते. वारकरी संप्रदायातील संतांची वेशभूषा व संगीतमय सुमधुर गायन व कीर्तनकाराचे चित्र समोर उभे राहते.
वृद्धत्वामुळे एकादा महाराज पायी वारीत पंढरपूरला जाऊ शकले नाहीत. तेव्हा त्यांनी त्यांचे शिष्य केशवबुवा व धोंडीभाऊ जवळ पांडुरंगस्तोत्र पत्रावर लिहून दिले. हे पत्र त्यांच्या शिष्यांनी पांडुरंग चरणी वाहिले. या स्तोत्रात भक्तांसाठी ईश्वराने काय केले पाहिजे याचे रसाळ वर्णन व आर्जव केले आहे. महाराजांची भाषा अत्यंत भावपूर्ण व करुण रसमय आहे. भक्त ईश्वराचे वर्णन करतात, परंतु भक्तांसाठी ईश्वराचेही काही देणे असते ही एक आधुनिक संकल्पना महिपती बुवांनी मांडली आहे.
ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर यांनी रचलेली श्री सदगुरु महिपती महाराजांची आरती या चरित्रात समाविष्ठ केलेली आहे.
महिपती महाराजांच्या समकालीन कविवर्य मोरोपंतांचा उल्लेख यात आढळतो. मोरोपंत यांच्या आर्या मराठी साहित्यात सुप्रसिद्ध आहेत. मोरोपंतांनी महिपती महाराजांना बदल त्यांच्या काव्यात आदर व्यक्त केलेला आहे. महिपती महाराजांबदल ते लिहितात.
'श्री रामदास लीला अतुला तुकिता तरी तुकाराम !
वर्णाया अवतरले द्विजरूपे महिपती तुकाराम
श्री हरि भक्ति रसाची श्रीहरी भक्तिरस सत्सुधा भरिते
चरिते गाता जेणे आयुष्य क्षण पडो दिले न दिले।।
या चरित्र लिखाणात महाराजांच्या जीवनातील घटनांचा वेध कालानुरूप झालेला नाही. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील ४०० ते ५०० संतांचे चरित्र लिहिणार्या या अफाट संत चरित्रकारांचे योग्य मूल्यमापन होणे आवश्यक आहे. त्यांची वाणी रसाळ साधी सोपी प्राकृत मराठीत आहे. त्यांच्या साहित्याची तुलना तुकाराम, एकनाथ, रामदास यांच्याबरोबर केली जाऊ शकत नाही. परंतु सर्वसामान्य बहुजन वर्गाला भक्तिमार्गाकडे वळविण्यात त्यांना यश आलेले आहे. त्यांच्या संत चरित्रामुळे सात्त्विक, धार्मिक व नैतिक तत्त्वज्ञानाची बैठक निर्माण होण्यास साहाय्य लाभले आहे. या अगोदर डॉ.रा.चि.ढेरे, वि.वि.राजवाडे, उषाताई देशमुख, वि.ल.भावे, सुरेश जोशी यांनी त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला आहे. संत महिपती महाराजांच्या संत चरित्रावर डॉ.उषाताई देशमुख यांनी कोल्हापूर विद्यापीठात संशोधन केलेले आहे. या संत साहित्याच्या अभ्यासकांच्या विचारांचा समावेश या चरित्रात करता आला असता. नाना महाराज वणकुटेकर हे स्वतः वयोवृद्ध ८० वर्षाचे गृहस्थ आहेत. महिपती महाराजांच्या श्रद्धेपोटी व त्यांचे ते पूर्वज असल्यामुळे त्यांनी या वयातसुद्धा हे पुस्तक प्रकाशित केले आहे, ही प्रशंसेची गोष्ट आहे.
महिपती महाराजांनी तीर्थयात्रेच्या निमिताने भारत भ्रमण केलेले आहे. त्यांनी देहू, आळंदी, पंढरपूर, नेवासा, पैठण येथे दिंडीबरोबर पायी प्रवास केलेला आहे. त्यांच्या समकालीन संतांचा प्रभाव, सामाजिक परिस्थिति व वारकरी संप्रदायातील त्यावेळची विठ्ठलभक्ति, परंपरा याचा शोध घेता आला असता.
या चरित्रात नगरचे सुप्रसिद्ध चित्रकार श्री वसंतराव विटणकर यांनी महिपती महाराजांच्या जीवनातील तुकाराम आशीर्वाद, ज्ञानदेव दृष्टांत आदी चित्रे खूपच सुंदर रेखाटली आहेत. या चारित्राचे प्रकाशक बाबासाहेब जपे आहेत. 83 पानी पुस्तकाची किंमत 50 रुपये असून ती परवडण्यासारखी आहे. या चरित्राचे स्वागत वारकरी संप्रदायातील सर्वच विठ्ठल भक्तांकडून केले गेले आहे. संतचरित्रे लिहिणार्या या महान संताचे चरित्र त्यांच्याच वंशातील श्री गोविंद म्हाळसाकांत कांबळे उर्फ ह.भ.प नानामहाराज वणकुटेकर यांनी प्रकाशात आणले आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन ! यामुळे महिपती महाराजांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे.
इतरत्र सापडलेला मजकूर
[संपादन]इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) १७:२७, ४ जून २०२१ (IST)
महिपतबुवा ताहराबादकर-मूळ आडनाव कांबळे (जन्म : इ.स. १७१५; मृत्यू : ६ सप्टेंबर १७९०) हे एक थोर मराठी कवी व संतचरित्रकार होते. दादोपंत कांबळे आणि गंगाबाई हे त्यांचे वडील आणि आई. वयाच्या साठाव्या वर्षी दादोपंतांना हा मुलगा झाला.
लहानपणापासून महिपतींना भजन कीर्तनाचा लळा. त्यांच्या वयाच्या १६व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यावर प्रपंचाचा भार त्यांच्यावर पडला. गावची कुलकर्णी ही जवाबदारी त्यांच्याकडे होती, परंतु सरकारी अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यावर त्यांनी ही चाकरी सोडली, आणि पूर्णवेळ भजन कीर्तन हा ईश्वरोपासनेचा मार्ग स्वीकारला. त्यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते. तुकाराम महाराजांच्या प्रेरणेने उतारवयात ते ग्रंथ रचनेकडे वळले. शनिमाहात्म्य हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ.
महिपतबुवांनी विविध संतांची चरित्रे अभंगरूपाने गायली. 'प्रभंजनाचे योगे जाणा l डोळे तृणांचे बुझावत l तेवी आपले बुद्धीस स्फुरण ते l तुझे सत्येने पांडुरंगा ll ही दृष्टी ठेवून त्यांनी मोठया भक्तिभावाने संत चरित्रग्रंथाची निर्मिती केली. त्यांची निवेदन पद्धती प्रासादिक, रसाळ व साधी आहे.
लेखन
[संपादन]महिपतीबुवांनी नाभाजी, उद्धवचितधन या होऊन गेलेल्या संतचरित्रकारांचा आधार घेऊन व 'भक्तविजय' या ओवीबद्ध संतचरित्रावरून ग्रंथरचना केली. काही माहिती त्यांनी स्वतः मिळवली.
महिपतबुवांनी लिहिलेली चरित्रे
[संपादन]- ऋषिपंचमीवृत्त
- कथासारामृत (या पुस्तकात कार्तिक वृत्त, माघमाहात्म्य, वैशाख वृत्त एकादशी महात्म्य या पौराणिक कथा आल्या आहेत.)
- गणेशपुराण
- तुलसी माहात्म्य
- भक्त दामाजी
- संत नामदेव
- पांडुरंग माहात्म्य ऋषिपंचमीवृत्त
- बोधलेबुवा
- भक्तिलीलामृत (संत व भक्त यांच्या चरित्रावर)
- भानुदास
- विसोवा सराफ
- शनिमाहात्म्य
- संत [[ज्ञानेश्वर|ज्ञानदेव}
- संतलीलामृत ( या पुस्तकात चांगदेवांसह एकूण ५० संतांच्या चरित्रकथा आल्या आहेत.)
- संतविजय (या पुस्तकात २६ अध्याय असून त्यात रामदास व बाबाजी गोसावी यांची चरित्रे आहेत.)