चर्चा:शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी
Appearance
या लेखात कोणत्या किल्ल्यांची यादी अपेक्षित आहे? शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या, बांधलेल्या, हरलेल्या कि या सगळ्या? महाराष्ट्रीतील? बाहेरील? सगळीकडील?
महाराष्ट्रातील (तसेच इतर राज्यांतील) किल्ल्यांची यादी असलेले लेख आहेतच. यात बदल किंवा भर घालून हीच माहिती तेथे देता येईल का?
तरीही हा लेख करावयाचा ठरविल्यास नुसती यादी न करता त्या माहितीची आकारणी केल्यास लेखाला उपयुक्तता येईल, नाहीतर नुसतीच जंत्री होउन बसेल.
अभय नातू (चर्चा) २३:०७, १० नोव्हेंबर २०१३ (IST)
- अभय म्हणतात तसे सुस्प्ष्ट इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने अधिक नेमकेपणाची आवश्यकता आहे.केवळ एका बखरीत उल्लेख आहे या पेक्षा ती नेमकी कोणती बखर,कोणत्या किल्ल्यांच्या बांधणी विषयी इतर कागदपत्रातून/दस्तएवजातून दुजोरा मिळतो. इतिहासलेखन मूळ संदर्भांसहीत किल्लेवार झाल्यास अधिक नेमकेपणा येऊ शकेल किंवा कसे या बद्दल विचार व्हावयास हवा.
- महाराष्ट्र भारत धरून आशिया आणि यूरोपातील Prehistoric कालीन (डोंगरी) किल्ल्यांची संख्या सुद्धा (बरीच) मोठी आहे. त्यातील बऱ्याच किल्ल्यांची नंतरच्या काळात पुर्नबांधणी/जीर्णोद्धारही विवीध कालावधीत होत राहीले. त्या शिवाय नवे किल्लेही बांधले गेले.वेगवेगळ्या कालावधीतील किल्ले बांधणीतली वैशीष्ट्ये कोणती आणि शिवाजी महाराज कालीन किल्ले बांधणीतील वैशीष्ट्ये कोणती याची माहिती सुद्धा संदर्भासहीत उपलब्ध असल्यास ज्ञानकोशीय लेखनास उपयूक्त ठरेल.एकुण अधिक नेमकेपणाचे स्वागत असेल.