चर्चा:वि.ग. कानिटकर
Appearance
या लेखात ‘[स्रोत संपादीत करा]’ असे एक न पुसता येणारे शीर्षक दिसते आहे. स्रोत म्हणजे काय? कुणाचा/कशाचा स्रोत? आणि संपादीत? दी दीर्घ केव्हा येईल? जेव्हा ‘दी’ऐवजी ‘द’ चालेल तेव्हा! उदा० मी करीत आहे किंवा मी करत आहे. वाचीत आहे/वाचत आहे, चालवत आहे/चालवीत आहे, वगैरे ‘संपादीत करा’ऐवजी ‘संपादत करा’ चालेल? वाक्य असे पाहिजे - स्रोताचे संपादन करा किंवा स्रोत संपादित करा. सर्वात उत्तम नुसतेच ‘संपादन करा’. ‘स्रोत’ शब्दाची गरज नाही.... ज (चर्चा) ००:१७, ३१ ऑगस्ट २०१६ (IST)
- याच नव्हे तर सगळ्याच लेखात तुम्हाला स्रोत संपादित करा असे दिसेल. मीडियाविकी सॉफ्टवेरमध्ये सुधारणा होउन आता यथादृष्यसंपादक (Visual Editor) हा सगळ्यांसाठी डीफॉल्ट केला गेला आहे. स्रोत संपादित करा हे जुन्या पद्धतीने संपादन करण्याची सोय आहे.
- नवीन (किंवा जुनाही) संपादक वापरण्यास अडचण आल्यास कळवावे म्हणजे मदत करता येईल.
- अभय नातू (चर्चा) ०७:२२, ३१ ऑगस्ट २०१६ (IST)