Jump to content

चर्चा:राहुल शेवाळे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग बद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे विशेष चर्चेची अपेक्षा आहे.

कारण: कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.



हि कॉमेंट केवळ एका विशीष्ट राहुल शेवाळे या लेख विषया बद्दलच नाहीतर या निमित्ताने अशा सर्व मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने महत्वपूर्ण विश्वकोशीय उल्लेखनीयता संदर्भाने चर्चा व्हावी असा उद्देश आहे.
बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवक मंडळीचे विश्वकोशातील सुचीमध्ये नाव दाखल होण्यापलिकडे विश्वकोशीय माहिती उपलब्ध होण्याची शक्यता कमी असेल (कारण तशा स्वतंत्र नोंदी ठेवण्याची भारतात परंपरा नाही) काही अपवादात्मक लोकांबद्दल एखाद परिच्छेदभर माहिती उपलब्ध होईल. आपवादात अपवाद लोकांबद्दल लेख पूर्ण होण्याइतपत विश्वकोशीय माहिती उपलब्ध होईल.
किमान एकही परिच्छेद नसलेले लेख त्या व्यक्तीच्या व्य्क्तीमत्वाचा मागोवा देण्या एवजी विनाकारण केवळ मर्यादेकडे निर्देश करतात. तेव्हा त्यांचा उल्लेख सुचीत करावा विकिपीडियावर सुद्धा सुची नावाचे विशेष नामविश्व असावे. ज्यांच्या बद्दल एक एक परिच्छेद लिहिता येतील असे एका विशेष लेखात संकलीत करावे.नामविश्व मुख्य नामविश्वा सोबत शोध उपलब्ध करून देईल असे बघावे असा प्रस्ताव ठेवत आहे . माहितगार १५:०१, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)