Jump to content

चर्चा:युरोपीय प्रबोधनाचा काळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझ्या मते रिनैसाँचा अर्थ प्रबोधनपेक्षा नूतनीकरण, आमूलाग्र बदल, जुने झटकून देउन नवीन अंगिकारणे असा काहीसा होईल. नेमका मराठी शब्द आत्ता सुचत नाही.

अभय नातू ०२:११, ४ एप्रिल २०११ (UTC)

http://www.manogat.com/pari/search/Renaissance/0 मनोगतावर उपलब्ध विश्वकोश शोधात] वेगवेगळे शब्द दिले आहेत. बालभारतीत कोणता शब्द वापरला होता ते आता आठवत नाही सुयोग्य शब्द सुचवावा त्या प्रमाणे बदल करता येईल माहितगार ०२:१८, ४ एप्रिल २०११ (UTC)
मराठी माध्यमाच्या इतिहास पुस्तकात मी नववीत असताना आम्हांला दा विंची, गुटेनबर्ग इत्यादी मंडळींच्या कालखंडाचा इतिहास होता; त्यात प्रबोधन असा शब्द रेनेसाँसाठी वापरला होता. त्याचप्रमाणे युरोपियन रेनेसाँ', 'इंडियन रेनेसाँ' या संज्ञांसाठी शालेय आणि महाविद्यालयीन पाठ्यक्रमांत 'युरोपीय प्रबोधन', 'भारतीय प्रबोधन' अश्या संज्ञा वापरल्या होत्या.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:१७, ४ एप्रिल २०११ (UTC)
शब्दश: 'पुनरुज्जीवन' हा शब्द कदाचित अधीक जवळचा असावा पण शालेय शिक्षणात आणि इतरत्र प्रबोधन हा शब्द अधिक प्रचलीत असण्याची शक्यता वाटते अजून काही मते मांडली जातात का पहावे .
इतरत्र जेंनी मुद्दा मांडला तसा पुनरुज्जीवन शब्दासोबत कर्म-कर्ता इत्यादी टाळण्याच्या दृष्टीने प्रबोधन शब्द प्रचलित असल्यास कल्पना नाही.कारण पुनरुज्जीवन तर मग कशाचे पुनरुज्जीवन ? असा पायात चप्पल का? चपलेत पाय वाला मुद्दा उपस्थित होऊ शकतो

माहितगार १४:२३, ४ एप्रिल २०११ (UTC)


अरे वा वा चक्क महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ मिळाले आणि सोबत सुयोग्य शब्दाची माहितीही ती अशी "रेनेसॉं म्हणजे नवजीवन किंवा पुनरुत्थानाचा काळ (इ. स. १४५३ ते १६९०) , प्रबोधनाचा किंवा एन्‌लायटन्‌मेंट काळ (इ. स. १६९० ते १७८१) जर्मन तत्त्वज्ञान (इ. स. १७८१ ते १८३१) आणि नंतर एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील एकूण ५०० वर्षात लिओनार्दो द विंची, ब्रुनो, कोपर्निकस, केप्लर, गॅलिलिओ, फ्रॅन्सिस बेकन आणि पुढे देकार्त, स्पिनोझा, लॉक, ह्युम, रुसो, कान्ट, हेगेल, मार्क्स, रसेल अशी एक तत्त्वज्ञांची प्रदीर्घ मालिकाच तयार झाली."
मला वाटते वरील उल्लेखानुसार सुयोग्य शीर्षक लेखन करण्यास हरकत नसावी माहितगार ०९:४५, ९ एप्रिल २०११ (UTC)

Start a discussion about युरोपीय प्रबोधनाचा काळ

Start a discussion