युरोपीय प्रबोधनाचा काळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

युरोपीय प्रबोधनाचा काळ किंवा रानिसां (इंग्रजी Renaissance रेनेसांस अथवा रेनायसांस ) ही साधारणतः १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत झालेली युरोपातील साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ, प्रबोधनयुग अथवा प्रबोधनाचे पर्व म्हणून ओळखली जाते. इटलीतील फ्लोरेन्स या शहरात सुरू झालेली सांस्कृतिक चळवळ कालांतराने सर्व युरोपात पसरली.