चर्चा:मुळाक्षर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Untitled[संपादन]

Please reffer en:Marathi_language and help to update IPA related aspects of this page. Mahitgar 12:56, 9 सप्टेंबर 2006 (UTC)

मूळाक्षर की मुळाक्षरे???[संपादन]

माझ्या मते या लेखाचे नाव 'मुळाक्षरे' असे हवे. या शब्दात 'ळा' हे अक्षर गुरू (म्हणजे जास्त काळ उच्चारले जाणारे) असल्याने त्याआधीचा 'म'चा उकार लघु अर्थात र्‍हस्व होतो. त्यामुळे 'मु' असे पहिल्या अक्षराचे लेखन असायला हवे. दुसरी गोष्ट 'मुळाक्षरे' अशा अनेकवचनी रूपातच हा शब्द लिहिला जातो असे स्मरते. एकवचनी रूप सामान्यतः प्रचलित नाही (अर्थात या दुसर्‍या मुद्द्याची शहानिशा करून घ्यायला हवी.).

त्यामुळे या बाबींची खातरजमा करून लेखाचे नाव बदलावयास हवे असे मला वाटते.

--संकल्प द्रविड 05:31, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

I checked sources you are correct on first.'मुळाक्षरे' अनेकवचनी रूपातच is preferable.Please assist me in making this correction.Thanks for pointing out mistake.

Mahitgar 05:51, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य तितका येथे समाविष्ट करावा

अभय नातू (चर्चा) ०९:२१, २४ मार्च २०१७ (IST)


मुळाक्षरे आणि आरोग्य थोडक्यात Word vibration Therapy.[संपादन]

आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे एक एक अक्षर अनुस्वार देऊन बरेच वेळा म्हटल्यास त्या उच्चाराच्या कंपनाने (व्हयब्रेशनने) तो अवयव नीट काम करू लागतो आणि आपले आरोग्य सुधारते.

षट्चक्रांची बीजाक्षरे या विषयाचा अभ्यास सुरु केला तेव्हाची गोष्ट. माझ्या पत्नीला दोन दिवस शौचास झाली नव्हती. रंगकिरण चिकित्सा, चुंबक चिकित्सा करूनसुद्धा फायदा झाला नव्हता. मी तिला २५-२५ वेळा वं शं षं सं बं भं मं यं रं लं ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हणायला सांगितली. तिने तसे केल्यावर तिच्या ओटीपोटात हालचाल जाणवली आणि तासाभराने काँल आला व एकदाचे पोट रिकामे झाले.

लहान मुलांना शु शी व्हावी म्हणून आपल्याकडे मोठी माणसे शु षू म्हणतात व मुलाला लघवी / शौच होते. लहान मुलाचे शरीर अतिशय कोवळे व नाजूक असते त्यामुळे ह्या बिजाक्षरांच्या दुसर्याने केलेल्या उच्चरांच्या कंपनांचाही परिणाम होतो.

सातार्याला एका बाईंना छातीत दुखले तर ठं म्हणा असे सांगितले. त्या म्हणाल्या अहो लक्षात कसे ठेवायचे? मी म्हटले विठ्ठल म्हणा. ही चर्चा येथेच संपली. दोन दिवसांनी त्या बाईंच्या छातीत दुखले. त्यावेळी त्यांना आठवला तो चर्चेतला विठ्ठल! नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले आणी स्वस्थ झाले

एका आजींना (वय ७३) संडासला त्रास, त्यामुळे gases असा त्रास होता. डॉक्टरांच्या मते आतड्यांना वयोपरत्वे शिथिलता आली. मी त्यांना मूलाधार व स्वाधिष्ठान ची अक्षरे म्हणावयास सांगितले. त्या म्हणाल्या ही अक्षरे लक्षात कशी ठेवायची? म्हणून त्यांना ‘बं भोले नमः शिवाय’ म्हणण्यास सांगितले. (यामध्ये मूलाधार व स्वाधिष्ठान ची बरीच अक्षरे येतात) आठ दिवसात त्यांनी सांगितले की ‘काका मला चांगला फरक पडला तुमच्या मंत्रामुळे’ दोन महिन्यांनी माझ्या पत्नीला आजी भेटल्या तिलाही सांगितले ‘काकांनी दिलेला मंत्र म्हणते आणि माझी तब्येत ठीक आहे. औषध घेत नाही!’

डोंबिवलीच्या एका बाईंचा फोन शनिवारी संध्याकाळी आला. ‘मला गेले १५-२० दिवस जुलाब होत आहेत. पोटात दुखते आहे. डॉक्टरांच्या औषधांनी फरक नाही. तुमची रंगकीरण चिकित्सेची औषधे तातडीने पाठवा.’ मी म्हणालो 'कुरिअर सर्व्हिस रविवारी बंद. तुम्हाला मंगळवारी औषधे मिळतील.’ ‘मग मी काय करू?’ मी म्हणालो 'तुमच्याकडे माझे षट्चक्रे आणि आरोग्य हे पुस्तक आहे ना? त्यातील मूलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूरची अक्षरे ५०-५० वेळा म्हणा

पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!!

आमच्या पूर्वजांनी निसर्गातल्या शक्तींचा अभ्यास करून माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज सोपे उपचार (ज्यात वैद्याला व डॉक्टरला पैसे मिळत नाहीत) दिले. त्यांना आम्ही जुनाट, अडाणी म्हणतो. अशास्त्रीय (पाश्चात्य लोकांना मान्य नाही असे) म्हणतो.

मराठीतील अक्षरे कोणीही कुठेही म्हटली तरी चालतात. तरी वाचकांना विनंती की विश्वास ठेऊन अथवा न ठेवता मराठीतील मुळाक्षरे म्हणण्याचा प्रयोग करून पाहावा. माझ्या अनुभवा प्रमाणे एक अक्षर १०० वेळा म्हणायला एक मिनिट पुरते. बर्याचशा आजारात मुलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्रांची अक्षरे १०० वेळा म्हणणे पुरते

मूलाधार चक्राची अक्षरे -

वं, शं, षं, सं

स्वाधिष्ठान चक्राची अक्षरे -

बं, भं, मं, यं ,रं, लं

मणिपूर चक्राची अक्षरे -

डं, धं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं, फं

अनाहत चक्राची अक्षरे-

कं, खं, गं, घं, चं, छं, जं, झं,टं, ठं

विशुद्ध चक्राची अक्षरे-

अं, आं, इं, ईं, उं, ऊं, ऋं, ऋृं, एं, ऐं, ओं, औं, अं, अंः

अज्ञा चक्राची अक्षरे-

हं, क्षं

अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी 'षट्चक्रे आणि आरोग्य' हे पुस्तक अभ्यासावे.