चर्चा:भोरटेक रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय होतू:,

येथे पाच नाही तर चार गाड्याच थांबतात. भुसावळ-मुंबई सेंट्रल स्लिप कोच हा भुसावळ-सुरत पॅसेंजरला लावलेला एक डबा असतो. हा डबा सुरतेस वेगळा काढला जाउन अहमदाबाद-मुंबई मार्गावरील गाडीस (अहमदाबाद-मुंबई पॅसेंजर असे आठवते) जोडण्यात येतो.

कृपया शहानिशा करुन योग्य ते बदल करावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २२:१९, १ डिसेंबर २०१७ (IST)

आपण येथे लिहिलेली माहिती पुर्णपणे सत्य आहे. एक डबा असला तरी त्याचा अधिकृत गाडी क्रमांक वेगळा आहे. त्यामुळे गाड्यांचे क्रमांक एकुण ५ होतात. भारतीय रेल्वेमध्ये अशा अनेक स्लिप गाड्या आहेत... त्यांचा क्रमांक व नाव वेगळा असतो. --अभय होतू (चर्चा) २२:३०, १ डिसेंबर २०१७ (IST)

गाड्यांच्या क्रमांकाबद्दल विवरण केल्याबद्दल धन्यवाद.
येथे ५९०७६ हा क्रमांक सुरत पॅसेंजर आणि स्लिप कोच अशा दोहोंना दिलेला दिसत आहे. स्लिप कोचचा क्रमांक नेमका काय आहे?
अभय नातू (चर्चा) २२:३४, १ डिसेंबर २०१७ (IST)