चर्चा:भारतीय निवडणुकांतील उमेदवाराचे अ व ब प्रपत्र
Appearance
या लेखाच्या मथळ्यात काही बदल करावे असे वाटते -
१. भारतीय निवडणुकांतील... हा फॉर्म फक्त भारतीय निवडणुकांत लागू होतो.
२. ए व बी फॉर्म चे मराठीकरण करावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २१:४७, ३ फेब्रुवारी २०१७ (IST)
१. आपणांस योग्य वाटेल तसे शीर्षक द्यावे. माझी यापूर्वी कधीच 'ना' नव्हती व राहणारही नाही.
२. भारतातील सर्व राजकीय पक्ष, भारतीय राजकारणातील व्यक्ति, राजकारणाशी संबंधीत व्यक्ति, राजकारणात रस असणारे सर्व व सुजाण वाचक व भारतातील संपूर्ण निवडणूक यंत्रणा हे 'एबी फॉर्म' याचेशीच अभ्यस्त आहेत. कोणीही शोधण्यासाठी 'एबी फॉर्म' असाच टर्म वापरेल. या उद्देशाने शीर्षकात व लेखात 'एबी फॉर्म' असा उल्लेख केला आहे.
तरीपण आपण म्हणत असाल तर हवे ते बदल करतो.
आभारी आहे. --वि. नरसीकर (चर्चा) ०९:४६, ४ फेब्रुवारी २०१७ (IST)
- धन्यवाद नरसीकरजी,
- वर मी लिहिलेले फक्त सुचवले होते. अर्थात, योग्य असतील ते बदल करावेत.
- अभय नातू (चर्चा) १३:४१, ४ फेब्रुवारी २०१७ (IST)
- आपण योग्य तेच सुचविता अशी माझी पक्की धारणा आहे. एक लाखाचे वर संपादनांचा अनुभव आहे नं! मागे पुनर्निर्देशन ठेवले आहे. कोणासही या लेखापर्यंत पोचता येईल.no issue. शीर्षकलेखनात मी थोडा अद्याप कच्चाच आहे.:) शुभेच्छा.