चर्चा:बोले इंडिया जय भीम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे:,

माझे बदल उलटविण्यामागची कारणे द्यावी. मी केलेल्या बदलांची कारणे -

१. वैशिष्ट्यपूर्ण - या चित्रपटात विशिष्ट असे काय आहे?

२. हेही पहा - हे सुद्धा पहा हा विभागमथळा आपण वापरतो. हेही नव्हे.

३. स्मारके वर्ग - चित्रपट हे व्यक्तीस्मारक नव्हे.

४. दलित इतिहास - या चित्रपटाचा दलित इतिहासाशी थेट संबंध नाही.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०१:०६, २९ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]


दोन्हीही वर्ग या लेखात असणे अपेक्षित आहे.

१)वैशिष्ट्यपूर्ण - हा शब्द इंग्रजी लेखातून भाषांतरित आहे. जय भीम या शब्दाचे उगम हे अज्ञात वैशिष्ट यात आहे.

२)हेही पहा – हे आपले जानकार सदस्य वापरत असतात. मी ही सुरूवातीला 'हे सुद्धा पहा' असेच वापरायचो (माझे जूने लेख पहा) पण नंतर येथील सदस्यच 'हेही पहा' हे वापरत म्हणून मी ही आता हे वापरतो.

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके (वर्ग) – ज्या कोणत्याही लेखाचा संबंध डॉ. आंबेडकरांशी असतो त्यास आंबेडकर स्मारक हा वर्ग लागू होतो. येथे आंबेडकर स्मारक याचा अर्थ वास्तू स्मारक असा घेऊ नये. चित्रपटाचा संबंध भक्कमपणे डॉ. आंबेडकरांशी असून त्यांचे मोठे चित्रण या चित्रपटात आहे. शिवाय चित्रपटाचे नावही त्यांनाच अनुसरून आहे.

४) दलित इतिहास – हा एक एतिहासिक चित्रपट असून याचा पूर्ण दलित इतिहासाशी आहे. हा चित्रपट पाहिल्यावर दिसून येईल की यात दलितांचा इतिहास आहे.

--संदेश हिवाळेचर्चा ०१:४५, २९ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]

मुद्दा नं १) व २) मध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे बदल केलेत, कारण त्यांना चूकिचे म्हणता येणार नाही. --संदेश हिवाळेचर्चा ०१:५२, २९ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]

३ - तुमची स्मारक शब्दाची व्याख्या अतिविशाल आहे. तुमचा तर्क ग्राह्य धरल्यास प्रत्येक चित्रपटांतून डझनावारी स्मारके निघतील. हा वर्ग येथे घालू नये.
४ - दलित इतिहास या वर्गात दलित इतिहासातील महत्वाचे लेख (epochal) घालावेत. नाहीतर प्रत्येक लेख कोणत्यातरी इतिहासात जाईल.
अभय नातू (चर्चा) ०२:०५, २९ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]