चर्चा:बायबल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

en:Bible translations into Marathi

Gnome-edit-redo.svgवियानी विन्सेंट डिसिल्वा:, आपण बरेच लेखन करत आहात. तरी काही गोष्टी/सुधारणा सुचवत आहे. विकिमधील लेखाची रचना,विभाग,मथळे,क्रमांकन इ.करण्याच्या पद्धती येथे पाहून/समजून संपादन करावे. शिवाय लेखातील जुना करार : पार्श्वभूमी यापासून खालील मजकूर या लेखाशी संबंधित नाही असे वाटते. त्याचे स्वतंत्र लेख करावेत.वर्णनात्मक शैली, विशेषणे टाळावीत. मराठी पेपरमधले संदर्भ देताना ते स्वयंचलित न करता स्वत: हाताने तपशील भरावा. मी दुरुस्त केलेला संदर्भ क्र.१२ यासाठी पहा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:४१, ३० जुलै २०१८ (IST)[reply]

Gnome-edit-redo.svgV.narsikar, Tiven2240, अभय नातू:, या लेखात अविश्वकोषीय मजकूर सातत्याने भरला जात आहे. वर साद दिलेले सदस्य आणि अंकपत्त्यावरूनही. हा सुरक्षित का करू नये. बराच मजकूर सुबोध बायबल या पुस्तकातून जसाच्या तसा घेतला जात आहे, जो अविश्वकोषीय आहे. त्याचे स्थान विकिस्रोत, विकिबुक प्रकल्पात आहे. तो मजकूर वगळू नये का? खूप भरणा झाल्यानंतर तो काढणे, त्यावर निर्णय घेणे अवघड होऊन बसते. आपल्याला अनेक लेखांच्या बाबतीत हा अनुभव आला आहे. तरी त्वरित कार्यवाही करावी ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०७:५९, ३१ जुलै २०१८ (IST)[reply]

जर प्रताधिकारित मजकूर भरला जात असेल (सुबोध बायबल हे पुस्तक प्रताधिकारित असल्यास), असा मजकूर टाकोटाक काढला जावा.
पुस्तक प्रताधिकारित नसेल तर ते विकिस्रोत किंवा विकिबूक्समध्ये आणावे.
मजकूरातील बायबल बद्दलची माहिती आणि साधारण रूपरेषा असावी परंतु फार मोठा वर्णनात्मक मजकूर असू नये.
सध्या मजकूर पाहिला असता त्यात बदल गरजेचे आहेत. तेथे {{बदल}} साचा लावला जावा.
अभय नातू (चर्चा) २१:५४, ६ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

सुबोध बायबल हे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रकाशित केलेले मराठी बायबल आहे. त्याचे isbn क्रमांक - ISBN 978-81-7434-499-1 आहे. अधिक माहिती वर भेटेल --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:२०, ६ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

हे पुस्तक प्रताधिकारित आहे?
अभय नातू (चर्चा) १२:२०, ७ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

हे शंकास्पद आहे कारण काही बायबल पब्लिक डोमेनमध्ये आहेत. काही शोध करायला लागेल परंतु प्रताधिकारित मजकुर असण्याची शक्यता कमी आहे कारण जरी प्रताधिकारित असले तर त्याला पब्लिक डोमेनमध्ये असलेले बायबल शब्दात बदलू शकते. मराठी विकिस्रोतावर मुक्त बायबल मजकुर उपलब्ध आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:३१, ७ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

जर या पुस्तकाच्या प्रताधिकाराबद्दल शंका असेल तर तेथील मजकूर येथे मुळीच आणू नये आणि आणलेला मजकूर घालवून द्यावा.
बायबलच्या इतर प्रताधिकारित नसलेल्या आवृत्त्यांमधील (उदा. किंग जेम्स) मजकूर जसाच्या तसा कमीतकमी आणावा. येथे बायबदल बद्द्लची माहिती अपेक्षित आहे, बायबल नव्हे.
अभय नातू (चर्चा) १२:३३, ७ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]