Jump to content

चर्चा:बाबासाहेब आंबेडकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:बाबासाहेब अांबेडकर या पानावरून पुनर्निर्देशित)


लेखातील समस्या

[संपादन]

हा संपूर्ण लेख Wikipedia:UNDUE ने भरलेला आहे. भाषाही विश्वकोषास साजेशी नाही. तसेच लेखाचा मोठा भाग एकाच संदर्भावर आधाराला आहे आणि हा संदर्भ तटस्थ संदर्भ नाही, कारण तो लेखाच्या विषयास Tribute म्हणून लिहिला आहे. तसेच संदर्भाचे लेखक इतिहास विषयातील स्कॉलर नाहीत, तर popular historian आहेत. पुढील काही दिवस मी यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणाला मदत करायची असल्यास सोबत करावी. Akshaypatill (चर्चा) १७:३४, २३ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]

@Akshaypatill: नमस्कार
संपादन युद्ध आणि काही कॉपीराईट प्रकरणामुळे हा लेख काही वर्ष पूर्णतः सुरक्षित होता. नंतरच्या काळात मी दुसऱ्या एका सराव पानावर हा संपूर्ण लेख नव्याने लिहिला, आणि त्यातील प्रत्येक ओळ, प्रत्येक मजकूर प्रचालक अभय नातू यांनी तपासला आणि त्यात आवश्यक तो बदल केल्यानंतरच तो (प्रत्येक मजकूर) या लेखामध्ये हलवला गेला आहे. मी लेख सुधार सुरू करणे आणि अभय नातू यांना त्याला दुबार सुधारुन या लेखात टाकणे या प्रक्रियेला एका वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. हा लेख कसा निर्माण झाला याची पार्श्वभूमी लक्षात यावी म्हणून हे मी लिहिले आहे.
लेखाचा मोठा भाग एकाच संदर्भावर आधारित असला तरी हा लेख Tribute म्हणून लिहिलेला नाही. ऐतिहासिक घटनांसाठी हा संदर्भ महत्त्वपूर्ण ठरतो. लेखाची भाषा विश्वकोषास साजेशी नाही, हे तुमचे म्हणणे निरर्थक आहे. तुम्ही लेखात सुधारणा करत असल्याचे तुम्ही म्हटले आहे, यासाठी तुमचे स्वागत आहे, आणि लेखाला कोणी समृद्ध करत असेल तर आम्हा संपादकांना आनंदच आहे. मात्र सुधारणेच्या नावाखाली तुमच्याकडून कळत-नकळत चुकीची संपादने (संदर्भ हटवणे, अनावश्यक काटछाड, मजकूर वगळणे, विद्रूपीकरण इ.) झाली तर ती निश्चितपणे हटवण्यात येतील, याची नोंद घ्यावी. संपादनासाठी शुभेच्छा, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १८:४६, २३ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
मी बऱ्याच वर्षांपासून इंग्रजी विकिपीडिया वर संपादने करतोय. हे अकाउंट बनवण्याआधीही बराच काळ संपादने केली आहेत. मी विकिपीडियाच्या Policies कटाक्षाने पाळतो. जे Wiki पॉलिसीजच्या विरुद्ध आहे ते मी नक्कीच व्यवस्थित करणार, बाकी बाबतीत काळजी नसावी. तसेच वाद टळावा म्हणून लेख लॉक करण्यापेक्षा विकिपीडिया पॉलिसी न पळणाऱ्या संपादकास तात्पुरते किंवा कायमचे बॅन करणे उत्तम. असो, लेखाकडे वळू. किंचितशी अतिशयोक्ती होईल, पण इंग्रजी विकिपीडियावरील कोणी येथे आला, तर अर्ध्या मिनिटात सांगेल की हा लेख 'Fanboy' स्टाईल ने लिहिला आहे.
दुसरी समस्या अशी आहे की हा लेख हनुमानाची शेपूट बनला आहे. एकापेक्षा अधिक पृष्ठे बनवून लेख विभागण्याऐवजी एकच लेख ठासून भरला आहे. तसेच स्वतंत्र पृष्ठे असूनही काही भाग परत लेखात ठेवला आहे. WP:CHOKING पहा. उदा. रामजींसाठी स्वतंत्र पृष्ठ बनवले आहे, आणि लिंकही केलं आहे. त्यामुळे या पृष्ठावर त्यांची इतकी अत्याधिक माहिती देण्याची गरज नाही. वाचक बाबासाहेबांची माहिती वाचायला या पेजवर येतोय, रामजींची नाही.
तसेच, या लेखासाठी विश्वासू स्त्रोत लागतील. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड हे हिंदीचे प्राध्यापक आहेत. इतिहासविषयक अभ्यास करण्यासाठी जी विशेष पद्धती अवलंबावी लागते, आणि ज्या पद्धतीने प्राथमिक आणि इतर द्वितीयक संदर्भांचा अभ्यास करावा लागतो ती त्यांना अवगत नाही. त्यामुळे अशा इतिहासाशी संबंधित आणि महत्वाच्या लेखासाठी असे संदर्भ अजिबात उपयोगाचे नाहीत. यासाठी विश्वासू इतिहासकारांनी लिहिलेले आणि विश्वासू संपादकाने प्रकाशित केलेले संदर्भ लागतील. Akshaypatill (चर्चा) ०२:२०, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]

सूचना

[संपादन]
नमस्कार, कृपया लक्षात घ्यावे की मराठी विकिपीडिया हा स्थानिक भाषिक विकिपीडिया असून, प्रत्येक विकिपीडियाचे लेखन शैली ही तेथील जाणकारांच्या लिखाणातून निर्माण झालेली असते. आपण इंग्रजी विकिपीडियाचे अभ्यासू असलात तरी मराठी विकिपडियाची लेखन शैली प्रथम अभ्यासावी. प्रथम नवीन सदस्यांना मार्गदर्शन तसेच यातील 'सहाय्य पाने' हा परिच्छेद अभ्यासावा. येथे 'मराठी विकिपीडियावर वरील कामे करण्यासाठी आपल्याला "मराठी विकिपीडिया" ची थोडीशी तोंड ओळख होणे आवश्यक आहे' असा स्पष्ट उल्लेख आहे. तो का आहे हे प्रथम समजून घ्यावा. अपेक्षा आहे आपण प्रथम अभ्यास कराल. मराठी विकिपीडिया वर प्रथम छोटी छोटी संपादने कराल आणि मगच मोठे बदल कराल.-संतोष गोरे ( 💬 ) १८:५४, २३ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
नमस्कार,
@Akshaypatill: आणि इतर सदस्य/प्रचालक,
दोन गोष्टी येथे नमूद करतो.
१. लेखात आपण सगळ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या असल्या तरीही तो पूर्णपणे अचूक आहे असे कधीच होणार नाही. यात वेळोवेळी बदल होणे साहजिक आहे, नव्हे, असे पाहिजेच. यात त्रयस्थ व्यक्तींचा (उदा. Akshaypatill) दृष्टिकोन उपयुक्त ठरू शकतो.
२. वरील (आणि पूर्वीची) चर्चा आणि नोंदी पाहिल्या असल्यास लक्षात येईल की हा लेख अनेकदा वादग्रस्त ठरलेला आहे आणि कोणताही, अगदी छोटाशा सुद्धा, बदलावरुन भांडाभांडी, निरर्थक वाद सुरू होतात. असे असता पुढील बदल करण्यासाठी हे बदल एखाद्या धूळपाटीवर करुन काही जाणत्या सदस्यांकडून निरखून घेउन मगच लेखात समाविष्ट करावे.
यासाठी मी हे पान तयार केले आहे -- धूळपाटी/बाबासाहेब आंबेडकर/प्रस्तावित बदल-२०२३ तसेच एक बदलाचे उदाहरणही दिले आहे.
याचा कृपया यथेच्छ उपयोग करावा.
असो. तुमच्या सगळ्यांच्या मराठी विकिपीडियावरील योगदानाबद्दल आणि समंजस संवाद साधून मार्ग काढण्याबद्दल धन्यवाद!
अभय नातू (चर्चा) ०१:५६, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
नक्कीच सर. Akshaypatill (चर्चा) ०२:२७, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
जुन्या चर्चा, मी नवे Archive बनवून चर्चा:बाबासाहेब आंबेडकर/चर्चा ३ मध्ये टाकल्या आहेत. Akshaypatill (चर्चा) ०२:५१, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
@Akshaypatill: लेखात थेट बदल करणे टाळावे. अभय नातू यांनी बदल करण्यासाठी धूळपाटी/बाबासाहेब आंबेडकर/प्रस्तावित बदल-२०२३ हे पान उपलब्ध दिले आहे. येथे बदल करावेत आणि इतर प्रचालक/सदस्य त्यावर विचार करून पुढील निर्णय घेतील.--संदेश हिवाळेचर्चा ११:२४, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
@Sandesh9822 विकिपीडियावरील लेखाचे मालकीहक्क कोणाकडेही नाही आहेत. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर चर्चा करण्याची गरज मला वाटत नाही, त्यामुळे तशी अपेक्षा ठेऊ नये आणि विकिपीडिया मला तसा अधिकारही देते. कृपया en:WP:JUSTDOIT वाचून घ्यावे. "Be bold can best be explained in three words: "Go for it." We would like everyone to be bold and help make Wikipedia a better encyclopedia. Do not be upset if your bold edits get reverted."
आणि तुमच्याप्रमाणेच मीही कोणतेही आर्थिक किंवा इतर फायद्याची अपेक्षा न ठेवता इथं योगदान देत आहे, त्यामुळे पुढच्या वेळी बदल उलटवताना आम्ही देत असलेल्या वेळाचाही आदर करावा आणि काही वैध कारण किंवा आक्षेप असेल तरच बदल उलटवावा. धन्यवाद. तुमचा बदल मी परतवतोय कारण तुम्ही कोणतेही वैध कारण दिलेले नाही. -- Akshay«चर्चा» १३:०१, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
बारीक सारीक संपादने म्हणजे अचुक संपादने करणे असा अर्थ होत नाही.‌ प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर चर्चा करण्याची गरज मला वाटत नाही असे तुम्ही म्हणत आहात. खरं तर यासारखे निरर्थक वाद आणि संपादन युद्ध टाळण्यासाठीच धूळपाटीवर ते पान तयार करण्यात आले आहे. त्यावर तुम्ही बदल करणे / सुचवणे अपेक्षित आहे. तुम्ही केलेल्या संपादनाला उलटवावेळी "काय बदल केला त्या जागेत" मला वैध देण्याची व तेथे चर्चा करण्याची इच्छा नाही. ठरवून दिलेल्या पानावर वैध कारणे मी देईन. अलीकडील तुमच्या संपादनात दिसून आले की तुम्ही एक बाब (प्रतिभावान) सांगून त्यासोबतच दुसरीही बाब (उच्च विद्याविभूषित) हटवत आहात. तुम्हाला अपेक्षित बदल धुळपाटीवर नोंदवणे आणि इतर प्रचालकांच्या सहमतीचे त्यांना मुख्य लेखात समाविष्ट करावे, असा स्पष्ट संकेत ठरवून दिला असताना आणि तुम्हीही त्यात सहमती दर्शवली असताना मुख्य लेखात बदल करु नये. तुमच्या प्रमाणेच सर्वांचाच वेळ मौल्यवान आहे. हा लेख पूर्णपणे अचूक आहे आणि त्यात सुधारणा करण्याची गरज नाही असे माझे मत नाही. विकिपीडियावरील लेखाचे मालकीहक्क कोणाकडेही नाही आहेत, परंतु मराठी विकिपीडियावरील प्रचालकांनी ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार तुमच्याकडून बदल होणे अपेक्षित आहे. याचा भंग करून जर तुमच्याकडून "अनुचित" संपादने झाली तर उलटवली जातील. --संदेश हिवाळेचर्चा १३:२०, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
@Sandesh9822 मी वर 'लेखातील समस्या' मध्ये लिहिलेला रिप्लाय वाचा. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड यांचे पुस्तक हा येथे वैध संदर्भ नाही. ते हिंदीचे प्राध्यापक आहेत, त्यांचा इतिहास विषयाशी काही संबंध नाही आणि इतिहास विषयक लेखनासाठी आवश्यक कौशल्यही त्यांच्याकडे नाही. हे म्हणजे शिवाजी महाराजांवर विश्वकोश लेख लिहिण्यासाठी रणजित देसाईंच्या कादंबरीचा संदर्भ देण्यासारखे आहे. त्यामुळे दुसरा वैध सोर्स द्या, नाहीतर या माहितीसाठी या लेखात जागा नाही. आणि तुमची लेखाशी असलेली attachment जरा बाजूला ठेवली तर बरं होईल, लेख neutral राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे येथे. en:WP:NPOV वाचावे...-- Akshay«चर्चा» १४:५६, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
@अभय नातू
सर, en:WP:3RR चा नियम मराठी विकिपीडियावर लागू आहे का? -- Akshay«चर्चा» १५:००, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
@Akshaypatill:
मराठी विकिपीडियावर सहसा restrictive नियम ढोबळमानानेच लागू केले जातात. संपादकांची वानवा पाहता प्रत्येकवेळी नियमांवर बोट ठेवून सदस्यांचा उत्साह कमी करण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधून नियम/संकेत पाळले जाण्याची खबरदारी घेतली जाते.
या विशिष्ट नियमाबद्दल म्हणलात तर आत्तापर्यंत क्वचितच ही वेळ आलेली आहे आणि प्रत्येक वेळी सदस्य आणि प्रचालकांनी त्यावर मार्ग काढलेला आहे.
पुढेही नियमांच्या चौकटीतच राहून परंतु अगदी प्रत्येक पाउल त्याबरहुकुमच असावे असे न करता आपण मराठी विकिपीडियावर काम करू अशी आशा आणि अपेक्षा आहे.
धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) २२:४९, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
@अभय नातू, संतोष गोरे, आणि Tiven2240: याची नोंद घ्यावी की सदस्य Akshaypatill अरेतुरेची भाषा करत आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. विशिष्ट ठिकाणी लेख बदलाची सुविधा उपलब्ध असताना देखील हा सदस्य वारंवार लेखात बदल करत आहेत.‌ --संदेश हिवाळेचर्चा १५:०९, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
यामागे अपमान करण्याचा जराही हेतू नाही. मी माझ्या नेहमीच्या भाषेत उत्तर लिहिले आहे. हे नियमाविरुद्ध असल्यास सुधारणा करण्यास मला काही हरकत नाही. मी यथायोग्य बदल केले आहेत. कृपया लेखावर आपले लक्ष केंद्रित करावे.. -- Akshay«चर्चा» १५:१७, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
@Akshaypatill आपण प्रचालक आणि प्रशासक काय म्हणतात ते न ऐकता, त्यांच्या सूचनांचे पालन न करता वरती असे लिहिले की विकिपीडियावरील लेखाचे मालकीहक्क कोणाकडेही नाही आहेत. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर चर्चा करण्याची गरज मला वाटत नाही, त्यामुळे तशी अपेक्षा ठेऊ नये आणि विकिपीडिया मला तसा अधिकारही देते. हे काय आहे? जर तुम्ही असे काही करण्यास सक्षम असाल तर एकदा इंग्रजी विकिपीडिया वर तसे सिध्द करा. त्यासाठी केवळ एक उदाहरण देतो, इंग्रजी विकिपीडियावर Banjara या लेखात पूर्वीचा उपलब्ध असलेला लेख Vanjari (caste) हा merge केलाय आणि Banjara लाखाच्या चर्चा पानावर त्यांचे समाधान झाल्या शिवाय ते दोन लेख परत वेगवेगळे होऊ देणार नाहीत. चला तर मग तुम्ही तुमचे इथे वर नोंदवल्या प्रमाणे विकिपीडियावरील लेखाचे मालकीहक्क कोणाकडेही नाही आहेत. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर चर्चा करण्याची गरज मला वाटत नाही, त्यामुळे तशी अपेक्षा ठेऊ नये आणि विकिपीडिया मला तसा अधिकारही देते. म्हणणे तेथे सिद्ध करा. आणि मग इथे बोला
(क्रमशः)-संतोष गोरे ( 💬 ) संतोष गोरे ( 💬 ) १५:४३, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
कृपया आपण en:WP:OWN वाचावे.
...
"No one, no matter what, has the right to act as though they are the owner of a particular article (or any part of it). Even a subject of an article, be that a person or organization, does not own the article, nor has any right to dictate what the article may or may not say." -- Akshay«चर्चा» १५:५५, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
@संतोष गोरे टॅग. -- Akshay«चर्चा» १५:५५, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
आता मूळ मुद्द्यावर येऊ या. एक नक्की आहे की तुम्ही एकदम वर म्हणालात तसे पुढील काही दिवस मी यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे मला पटले नाही. कारण तुम्ही सदरील लेखातील मजकूर फक्त उडवत आहात, त्यात चुका काढत आहात. जसे की येथे तुम्ही "लिंक चुकीची आहे. अधिक चांगला संदर्भ हवा." असे नोंदवले; का? तुम्ही जोडा ना योग्य तो संदर्भ. याला सुधारणा करणे असे म्हणतात, जी की मी लगेच योग्य संदर्भ जोडून केलीय. आणि हो, सदरील लेख मराठी विकिपीडिया वरील महत्वाच्या लेखा पैकी एक असल्याने संदेश हिवाळे आणि अभय नातू यांनी अभ्यास पूर्वक सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१ तसेच सदस्य:Sandesh9822/बाबासाहेब आंबेडकर/संदर्भ दुवे येथे काम करून मग मजकूर मुख्य लेखात जोडला आहे. आता तुम्हाला असे करण्यात काय गैर वाटत आहे. तुमची संपादने, सुधारणा, बदल तसेच सल्ले जर मराठी विकिपीडियावरील प्रचालक आणि प्रशासक मानण्यास तयार आहेत तर तुम्ही का त्यांचे अनुकरण करत नाहीत?-संतोष गोरे ( 💬 ) संतोष गोरे ( 💬 ) १५:५५, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
@संतोष गोरे सर, तुम्ही Wikipedia Policies वाचलेल्या दिसत नाहोत. ते वर तुम्ही सांगितलेले Banjara आणि Vanjari सारखे लेख merge किंवा demerge करण्यासाठी RFC घ्यावे लागतात. कृपया जोडलेल्या Wiki Policies वाचून घ्याव्यात, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
पुढचा मुद्दा असं आहे की हा लेख अवाढव्य झाला आहे. यातील बरीच माहिती विश्वकोशास अपेक्षित रचनेस अनुकूल नाही. अनावश्ययक माहिती आणि आवश्यक माहिती यांत भेद करून अनावश्यक माहिती काढून टाकणे आवश्यक आहे. विकिपीडिया Policy सांगते: [१] "Undue weight can be given in several ways, including but not limited to the depth of detail, the quantity of text, prominence of placement, the juxtaposition of statements, and the use of imagery." त्यामुळे यातील अनावश्यक माहिती, अनावश्यक फाफटपसारे काढावे लागतील कारण एक तटस्थ लेख लिहिण्यासाठी ते आवश्यक आहे. -- Akshay«चर्चा» १६:१७, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
मी असे सुचविन की बाबासाहेबांच्या इंग्रजी पेजवरील माहिती मराठीत भाषांतरित करावी, आणि तेथील संदर्भही जोडावेत, म्हणजे relible sources शोधत बसावे लागणार नाहीत आणि undue वाक्येही कमी करता येतील. -- Akshay«चर्चा» १७:२९, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]

महत्वाच्या Wiki Policies आणि guidelines.

[संपादन]

विकीपेडियावर लेख लिहिताना विकीपेडियाची लेखनविषयक धोरणे आणि रचना यांस अनुसरून लिहिणे आवश्यक आहे. सदरचा लेख लिहिताना येथे मोठ्या प्रमाणात Wikipedia Policies तोडण्यात आल्या आहेत. सर्वांच्या लक्षात यावे यासाठी काही महत्वाच्या Wiki Policies मी इथे मांडत आहे.

१)Reliable sources- en:WP:RELIABLE- विकिपीडियावर लिहिलेल्या लेख हा विश्वासू आणि तटस्थ संदर्भांवर आधारित असावा. अकॅडेमिक आणि विश्वासू संपादकांनी प्रसिद्ध केलेले संदर्भ वापरावेत.

२)Neutral point of view- en:WP:NPOV- लिहिलेला लेख तटस्थ असावा. त्यासाठी वापरण्यात आलेले संदर्भ तटस्थ असावेत.

३)इतिहास विषयक लेख लिहिताना वापरायचे विश्वासू संदर्भ- Wikipedia:Identifying reliable sources (history)- en:WP:HISTRS- इतिहासविषयक लेख लिहिताना इतिहास विषयातील स्कॉलर व्यक्तींचे संदर्भ वापरावेत.

४)Due and undue weight: en:WP:UNDUE- संदर्भामध्ये आहे म्हणून प्रत्येक गोष्ट लेखात लिहिणे आवश्यक नाही. महत्वाच्या असलेल्या आणि नसलेल्या गोष्टी यामध्ये भेद करून त्यांना किती जागा द्यायची हे ठरवणे आवश्यक आहे. (क्रमशः) -- Akshay«चर्चा» १६:५२, २४ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]

@Akshaypatill: were you able to find these on Marathi Wikipedia? --Tiven2240 (चर्चा) १९:०६, २५ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]