चर्चा:बँकॉक एरवेझ
बँकॉक हा शब्द प्रमाण मराठीत ’बँकॉक’ असा लिहितात. स्पेलिंगमधला ’जी’ हा इंग्रजीतही सायलेन्ट आहे. त्यामुळे लेखाच्या शीर्षकात आणि लेखात बँगकॉक असे लिहिणे योग्य नाही.
इंग्रजी-मराठी शब्दकोशांत air या शब्दाचा उच्चार ’एअ’ असा दिला असतो. म्हणजे ’ए’ नंतर ’अ’ हे अक्षर आवर्जून दिलेले असते इंग्रजी उच्चार संस्कृतीनुसार शब्दातील अंत्य ’र’चा उच्चार केवळ ऽ असा होतो. त्यामुळे air चा उच्चार फार तर एअऽ असा होईल. म्हणजे मधले ’अ’ हे अक्षर उच्चारातही टाळता येत नाही.
इंग्रजी शब्दांचे मराठी लिखाण हे त्या भाषेतल्या उच्चारानुसार असायलाच पाहिजे असे नाही. इंग्रजी आणि तशाच अन्य फोनेटिकली लिहिल्या न जाणार्या भाषांतील शब्द देशपरत्वे आणि प्रांतपरत्वे वेगळेवेगळे उच्चारले जाऊ शकतात. ऑक्सफर्ड डिक्शनरीत दिलेले शब्दोच्चार हे फक्त दक्षिण लंडनमधील एका विशिष्ट टापूत उचारले जाणारे उच्चार (RP) असतात. ते उत्तर-पश्चिम-पूर्व लंडन, उर्वरित इंग्लंड, स्कॉटलंड, कॅनडा, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पंजाब, दक्षिणी भारत, गुजरात आणि महाराष्ट्र या प्रदेशांत केलेल्या उच्चारांशी जुळायलाच पाहिजे असे नाही. तेव्हा उच्चार प्रमाण नसतात, तर लेखन प्रमाण असते.
air या शब्दाचे प्रमाण मराठी लेखन एअर असेच आहे, याबद्दल तिळमात्रही शंका असायचे कारण नाही. त्यामुळे airways या शब्दाचे प्रमाण मराठी लेखन एअरवेज असेच हवे.....J (चर्चा) १४:२१, २७ सप्टेंबर २०१४ (IST)
- इंग्रजी शब्दांचे मराठी लिखाण हे त्या भाषेतल्या उच्चारानुसार असायलाच पाहिजे असे नाही.
- साफ चूक. कोणत्याही शब्दांचे लिखाण त्या भाषेतील उच्चारानुसारच असायला पाहिजे.
- इंग्रजी-मराठी शब्दकोशांत air या शब्दाचा उच्चार ’एअ’ असा दिला असतो
- कोणते शब्दकोश? किती वर्षांपूर्वी त्यांचे आधुनिकीकरण केले गेले? इंग्लिश भाषेत/लिपित अनेक ambiguities आहेत. इंग्लिश बोलताना अनेक वर्णांचा उच्चार context-sensitive असतो. देवनागरी जरी phonetic असली तरी प्रमाण मराठीसाठी वापरली जाणाऱ्या देवनागरीत सगळे उच्चार उतरवून घेता येत नाहीत. या शब्दांचे उच्चार मराठी देवनागरीत लिहून दाखवावे --
- gate
- gait
- get
- air या शब्दाचे प्रमाण मराठी लेखन एअर असेच आहे, याबद्दल तिळमात्रही शंका असायचे कारण नाही. त्यामुळे airways या शब्दाचे प्रमाण मराठी लेखन एअरवेज असेच हवे.....
- का? आपण म्हणता म्हणून? यासाठी कृपया पटतील अशी कारणे द्यावीत.
- आपण एर, एअर वरून अनेकदा वाद घातलेला आहे. त्यासाठी आपण हिंदी उच्चाराचे व भारत सरकारने (हिंदीत) air indiaचे शुद्धलेखनाचा दाखलाही दिलात. हा दाखलाच मुळात चुकीचा आहे. हिंदी उच्चार व मराठी उच्चार यात साम्य असले तरी ते एकसारखे नाहीत.
- धन्यवाद
- अभय नातू (चर्चा) २२:०४, २८ सप्टेंबर २०१४ (IST)
- का? आपण म्हणता म्हणून? यासाठी कृपया पटतील अशी कारणे द्यावीत.
- ता.क. जर थाई भाषेत बँगकॉक ऐवजी बँकॉक असा उच्चार असेल तर तेच प्रमाण मानून या लेखाचे स्थानांतरण करावे.