चर्चा:पूरक उपग्रह प्रक्षेपण यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Augmented साठी हिंदीमध्ये संवर्धित असा शब्द योजलेला दिसतो. पूरक अधिक समर्पक आहे का?

अभय नातू (चर्चा) २०:४२, १८ फेब्रुवारी २०१७ (IST)

augmentation=the action or process of making or becoming greater in size or amount असा काहीसा इंग्रजीत अर्थ आहे. मराठीत -आवर्धन, वाढ करणे, वाढविणे, क्षमता वाढविणे, वर्धन करणे,आदी म्हणून संवर्धन.आणि मग संवर्धित असे आले.

पूर्वीचे उपग्रह प्रक्षेपण यान हे चार टप्प्यांचे होते. मग या यानात त्याचे पाच टप्पे केले. त्याची पेलोड क्षमता वाढविली. इतरही गोष्टी वाढविल्या म्हणून संवर्धन-संवर्धित.आमचे येथे सबस्टेशन augmentation scheme असायची, त्यात त्याच्या क्षमतेत वाढ करावयाचे. पूरक शब्दही ठिक आहे, पुरवणी देणे या अर्थाने,पण तो लांबीमध्ये वाढ दर्शवितो असे माझे मत आहे. असो. तसे मी पुनर्निर्देशन केलेच आहे त्याप्रमाणे. आपला लेख मूळ तसाच ठेऊन.
मी हिंदी विकिवर गेली अनेक वर्षे झाले गेलो नाही व या लेखाचे नावही बघितले नाही. आपण कळविल्यावर दुव्यावरुन बघितले.
मूळ इंग्रजी अर्थालाही ते साजेसे आहे असे वाटते. धन्यवाद.--वि. नरसीकर (चर्चा) २२:१८, १८ फेब्रुवारी २०१७ (IST)