चर्चा:परिणीता दांडेकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुबोध कुलकर्णी[संपादन]

@सुशान्त देवळेकर:, आपल्या सुचनेनुसार मी केलेले बदल उलटविले आहेत. मी रूढ पद्धत वापरून रचना केली होती. ती ही आवृत्ती. आपली पद्धत ही शास्त्रीय आहे. पण सध्याच्या संदर्भ जोडा या साधनाचा वापर करून असे संदर्भ देता येत नाहीत. इतर संपादकांना नवीन मजकूर लिहून संदर्भ द्यावयाचे असल्यास कोणती पद्धत वापरायची याविषयी संभ्रम/गोंधळ निर्माण होऊ शकतो. तसेच सध्या असलेल्या लेखात संदर्भ आणि संदर्भ सूची यांचा संबंध एकमेकांशी कसा लावायचा? वर क्रमांक आहेत, खाली बिंदू आहेत. प्रचालक व जाणकार संपादकांनी यावर मते द्यावीत ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:४६, २६ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

QueerEcoFeminist[संपादन]

  • @सुशान्त देवळेकर, सुबोध कुलकर्णी, आणि आर्या जोशी: {इतर तांत्रिक आणि संदर्भातल्या जाणकारांना साद द्यावी, मला माहित नाही की कोणाला ही तांत्रिक माहिती आहे.}
  • वास्तविक भारतातील जाती व्यवस्था हा लेख भाषांतरीत करताना मला हीच अडचण जाणवली होती पण मी भाषांतरावर भर देत असल्याने पहिले भाषांतर आणूया हा विचार करून तो मुद्दा सोडून दिला होता.
  • संदर्भ देण्याची पद्धती ही सर्वत्र एकच असण्याची गरज नाही, ती प्रत्येक लेखासाठी वेगळी असू शकते, फक्त अट एकच आहे की, एका लेखाला एकच असावी, एकाच लेखात अनेक पद्धती नको.
  • एस एफ एन पी पद्धत जी सुशान्त देवळेकर यांनी वापरली आहे, त्याची एक मोठी तांत्रिक अडचण आहे, त्यात नोंदीची यादी आणि पूर्ण संदर्भांची यादी ह्या दोन्हीचे विकिकोड स्वत: हाताने भरावे लागतात. आणि नोंदीची यादी व पूर्ण संदर्भांची यादी वेगळी लिहावी लागते.
  • झोटेरो सायटेशन इंजिन वापरून संदर्भ तयार करणारे सायटोईड आपल्याकडे आहे, त्यावर आपल्याला संदर्भांचा विकिकोड द्यावा लागत नाही संदर्भांचे दुवे दिले कि, पूर्ण संदर्भ आपोआपच तयार होतो.
  • शिवाय देवळेकर यांनी वापरलेल्या पद्धतीची आणखी एक मर्यादा म्हणजे त्यात reflist and notelist ह्या याद्या पूर्ण भरल्या नाहीत तर संदर्भांविषयी पूर्ण माहिती मिळत नाही, फक्त लेखकाचे नाव, साल, पान क्रं कळतो, त्यामुळे हे संदर्भ इतरांना समजायला किचकट होतात. तरीही सध्या कोणत्याही पद्धतीने होईन संदर्भ येऊदेत. सायटेशन बॉट सारखे बॉट आहेत जे ह्या संदर्भांना सुधारण्याचे किंवा पूर्ण भरण्याचे सगळे उद्योग स्वत:च करतात. इंग्रजीवर मी ते वापरतो. उदा ह्या पानावर वापरले आहे.
  • ह्या बाबतीत खरे तर काहीच माहिती मराठीत उपलब्ध नाही, त्यामुळे मी आता त्याची प्रारंभीक माहिती मराठीत आणतो. मग इतर सदस्यांनाही त्यावर अभ्यास करून मत देऊदेत.
  • सध्या माझ्यामते देवळेकर यांना जर स्वत: संदर्भ भरून एस् एफ एन पी पद्धत वापरून संदर्भ भरणे सोपे वाटत असेल तर ते करूदेत, ते नंतर सगळ्यांच्या मताने बदलणे सहज शक्य आहे.
  • आता संदर्भ देऊन लिखाण येणे महत्त्वाचे इतर तांत्रिक बाबी बॉटकरवी करवून घेता येतात. QueerEcoFeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०४:०९, २७ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

सुशान्त देवळेकर[संपादन]

  • @सुबोध कुलकर्णी, आर्या जोशी, आणि QueerEcoFeminist: चर्चेला सुरुवात झाली हे चांगलं झालं. मला विकिपीडियावरची संदर्भ देण्याची पद्धत फारच ढोबळ वाटते. त्यात नेमकेपणा आणण्याचा प्रयत्न केला तर अनावश्यक पुनरुक्ती होते. ह्या दोहोंहून मी सध्या वापरत असलेली पद्धत अधिक नेमकी आहे असे मला वाटते. त्यात काही अडचणी नक्कीच आहेत. त्यांपैकी काहींचा निर्देश वर आला आहे.
  • रूढ पद्धतीत पुस्तकाचा संदर्भ द्यायचा झाला तर नेमका पृष्ठक्रमांक देता येत नाही. नेमका पृष्ठक्रमांक दिला तर एकच संदर्भसाधन जितके वेगवेगळे पृष्ठक्रमांक संदर्भासाठी वापरू तितक्या वेळा पुनरुक्त होतात. म्हणजे संदर्भसाधनाची पृष्ठक्रमांकाव्यतिरिक्तची माहिती उगाचच पुनरुक्त होते. मी वापरत असलेल्या पद्धतीत संदर्भसूचीत एक संदर्भसाधन एकदाच नोंदवणे पुरेसे आहे. त्याचा निर्देश करून वेगवेगळ्या ठिकाणचे पृष्ठक्रमांक स्वतंत्रपणे संदर्भ ह्या विभागात नोंदवता येतात.
  • मी माझ्या वैयक्तिक स्वरूपाच्या विद्याशाखीय (अॅकॅडेमिक) लेखनात संदर्भ देताना अशीच एक पद्धत अनुसरतो. इंग्लिश विकिपीडियावर ही पद्धत वापरलेली मला आढळली आणि ती मराठीत वापरता येते का हे मी पाहायचा प्रयत्न केला. ती पद्धत वापरता आल्याने मी वापरत आहे. विकिपीडियावर ती उपलब्ध करण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान मला नसल्याने त्या दिशेने मी फारसा प्रयत्न केलेला नाही.
  • सुबोध कुलकर्णी ह्यांनी उल्लेखलेल्या अडचणींपैकी संदर्भ आणि संदर्भसूची ह्यांच्या संबंधाविषयी अधिक विचार करता येईल. संदर्भसूची ही अकारविल्हे (अ, आ, इ.. ह्या वर्णमालेच्या क्रमानुसार) लावता येईल. त्यायोगे त्यातील सामग्री शोधणे सुकर होईल. संदर्भ अर्थातच क्रमांकानुसार पाहता येतील.
  • वरील पद्धतीपेक्षा आणखी एक पद्धत आहे. त्या पद्धतीत मूळ मजकुरातच संदर्भ देताना लेखकनाम/ लेखकाचे आडनाव/ संदर्भनाम/ शीर्षक ह्यांपैकी एक आणि प्रकाशनवर्ष तसेच पुढे असेल तिथे पृष्ठ क्रमांक असे नोंदवण्याची पद्धत आहे. म्हणजे सध्या संदर्भ ह्या शीर्षकाखाली जे दिसते ते मजकुरातच दिसेल. त्यायोगे संदर्भ हा वेगळा विभाग देण्याची आवश्यकता नाही. पण हे कसे करायचे हे ज्ञान मला नाही.

सुशान्त देवळेकर (चर्चा) २०:२३, २७ ऑक्टोबर २०१८ (IST