परिणीता दांडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परिणीता दांडेकर ह्या भारतातील नद्यांचे आणि त्यांच्याशी संबंधित पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ह्यांसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्या साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अ‍ॅण्ड पीपल (एसएएनडीआरपी) ह्या संस्थेच्या सहयोगी समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.[१] नद्यांशी संबंधित समस्यांविषयी संशोधन करून अहवाल तयार करणे आणि त्याआधारे शासनस्तरावर पाठपुरावा करणे तसेच सर्वसामान्य जनतेत जागृती घडवण्यासाठी प्रयत्न करणे अशी कामे त्या करत असतात.[२]

शिक्षण आणि पाठ्यवृत्ती[संपादन]

परिणीता दांडेकर ह्यांनी २००१मध्ये विज्ञानशाखेची वनस्पतिविज्ञान ह्या विषयातील स्नातक (बॅचलर इन सायन्सेस) पदवी मिळवली. तसेच २००४मध्ये पुणे विद्यापीठातून विज्ञानशाखेची अधिस्नातक (मास्टर्स इन सायन्सेस) ही पदवी मिळवली.[३][१] त्यांनी २००९ मध्ये युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी आणि एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक, थायलंड येथून एकात्म-जल-स्रोत-व्यवस्थापन (डिप्लोमा इन इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट) ह्या विषयावरील पदविका मिळवली.[१]<ref>

२००९-२०१० ह्या कालावधीसाठीची नेदरलंडमधील जोक वॅलर हंटर एन्वार्नमेंट-लीडरशीप-पाठ्यवृत्ती त्यांना मिळाली.[१]

कार्य[संपादन]

परिणीता दांडेकर ह्या साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अ‍ॅण्ड पीपल ह्या संस्थेचे काम पाहत आहेत तसेच अमेरिकेतील इंटरनेशन रिव्हर्स ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठीही काम करत आहेत. मुक्तवाहिनी म्हणजेच ज्यांचा प्रवाह धरणाच्या अडथळ्याविना वाहतो अशा नद्यांना वाचवण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत.[२]

पुण्यातील विठ्ठलवाडी भागातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी नदीच्या पात्रात करण्यात येणाऱ्या बांधकामाविरुद्ध सारंग यादवडकर ह्यांनी केलेल्या याचिकेत त्या एक याचिकाकर्त्या होत्या. त्या याचिकेचा परिणाम म्हणून प्रशासनाद्वारे तो रस्ता नदीपात्रातून हटवण्यात आला. तसेच पुण्यातील नाल्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या विरोधातल्या याचिकेतही त्या उच्च-न्यायालय-नियुक्त-सदस्य होत्या.[२]

परिणीता दांडेकर आणि डॉ. लता अनंता ह्यांनी नदीतील पाण्याचा पूर्ण उपसा न होऊ देता तिच्या परिस्थंस्थेला आवश्यक तितके पाणी शिल्लक राहावे ह्यासाठी संस्थांना आणि लोकांना काय करता येईल ह्याविषयीचा भारतातील पहिला अहवाल लिहिला आहे.[२] [४]

पुरस्कार[संपादन]

  • किर्लोस्कर वसुंधरा-मित्र-पुरस्कार (२०१८)[५]

बाह्य दुवे[संपादन]

साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अ‍ॅण्ड पीपल ह्या संस्थेच्या प्रवाह ह्या अनुदिनीवरील परिणीता दांडेकर ह्यांचे लेखन

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d संक्षिप्त परिचय.
  2. ^ a b c d लोकसत्ता टीम.
  3. ^ प्रवाही नातं. Loksatta (Marathi भाषेत). 01-11-2018 रोजी पाहिले. दीपकला मी भेटले तेव्हा महाविद्यालयात होते. माझं वय जेमतेम २२ वर्षांचं |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ अनंता (२०१२).
  5. ^ किर्लोस्कर वसुंधरा-पुरस्कार २०१८.

संदर्भसूची[संपादन]