चर्चा:ना.गो. चाफेकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॉपीपेस्ट[संपादन]

@:

पहिल्या परिच्छेदातील "असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत." हे वाक्य गूगल शोधीले असता सरळ जोग, रा.श्री. यांच्या मराठी विश्वकोशातील चापेकर, नारायण गोविंद या नोंदीवर घेऊन जाते. एक तर आपण इतरत्र संदर्भ द्यायचे टाळता तसे इथेही कॉपीपेस्ट केले पण संदर्भ नाही अशी स्थिती आहे. मराठी विश्वकोशाचे कॉपी-पेस्टबद्दलचे नियम आता जरासे सैल झाले असले तरी यथोचित संदर्भ नमुद केले जावेत अशी त्यांची माफक अपेक्षा असते.


या निमीत्ताने जोग, रा.श्री. यांच्या मराठी विश्वकोशातील इतर नोंदी तपासल्या असता, अजून लक्षात आलेली अजून एक बाब अशी की, "असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत." अशा स्वरुपाची व्यक्तिगत मते वाचकावर लादणाऱ्या वाक्य रचना किमान त्यांच्या मराठी विश्वकोशातील इतर नोंदींमध्ये दिसत नाहीत. " हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले" या वाक्या वरुन वाचक त्यांचे विचार चौफेर होते असा बोध करुन घ्यायचा असेल तर करुन घेईल. ज्ञानकोशीय लेखकाने "असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत." अशी भलावण टाळणे सयुक्तिक ठरते. गौरवपर वगैरे उद्गारांसाठी विकिक्वोट हा स्वतंत्र विकिप्रकल्प उपलब्ध आहेच.


बदलापुरातील नियोजित स्मारक[संपादन]

हा विभाग तर वृत्तपत्रीय लेखनाचे कॉपीपेस्ट असण्याची साशंकता वाटते पण गूगल शोधाने तसे हाती आले नाही. संबंधीत वृत्तपत्राने कदाचित ऑनलाईन कॉपी जतन करुन ठेवली नसावी. हा परिच्छेद इतर नवागतांना नमुना दाखवण्या पलिकडे फारसा महत्वाचा नाही. पण एखाद्या महत्वपूर्ण नोंदीचा नंतर आंतरजालीय दुवा उपलब्ध न राहील्यास पुढच्या पिढीतील विकिपीडियन्सनी संदर्भ नेमके कुठे पडताळावेत ?

सबंध परिच्छेदात "न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर नानासाहेबांनी बदलापुरात मुक्काम ठोकला. बदलापूर गावात त्यांचा वाडा होता. तिथे देशभरातील नावाजलेल्या साहित्यिकांना ते आईच्या साहित्यिक श्राद्धाला आमंत्रित करत असत. त्यामुळे बदलापूरला बड्या साहित्यिकांचे पाय लागत असत." हे वाक्य ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले आहे. बाकी परिच्छेद निव्वळ भविष्यकालीन मागणीचे वृत्त आहे. त्याला वृत्तपत्रिय उल्लेखनीयता असेल पण ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे असे कसे म्हणावे ?

"न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर नानासाहेबांनी बदलापुरात मुक्काम ठोकला." या वाक्याची ज्ञानकोशीय शैलीत पुर्नरचना करण्याची आवश्यकता असावी. स्वत:च्या शब्दात लिहून मूळ माहिती देणाऱ्यांचा संदर्भ देणे साधे सोपे काम कॉपी-पेस्टने अवघड होऊन जाते. असो,

@संदेश हिवाळे: यांनी संदर्भ हवा साचा लावल्यामुळे लक्ष गेले, तेव्हा या निमीत्ताने ज्ञानकोशीय संपादकाने कात्री नेमकी कुठे लावायची ते त्यांना लक्षात यावे म्हणून लक्ष वेधले. असो.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:५०, ६ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]