चर्चा:नवबौद्ध चळवळ
Appearance
Untitled
[संपादन]मी भाषांतर शिकत आहे, पुन्हा या पानाकडे येऊन भाषांतर पूर्ण करिन. तो पर्यंत हे असेच राहुद्यात...
--श्रीमहाशुन्य (चर्चा) १३:५५, २ सप्टेंबर २०१५ (IST)
- फक्त शीर्षकाचे भाषांतर केले आहे. इतर भाषांतरात मदत लागली तर कळवालच.
- नवबौद्ध चळवळ आणि दलित बौद्ध चळवळ या दोन्ही वेगळ्या आहेत का? असल्या तर नेमके काय वेगळेपण आहे?
- अभय नातू (चर्चा) १९:०१, २ सप्टेंबर २०१५ (IST)
नवबौद्ध चळवळ व दलित चळवळ
[संपादन]बाबासाहेबांनी सुरू केलेल्या धर्मांतराच्या चळवळीला 'नवबौद्ध चळवळ' किंवा 'दलित बौद्ध चळवळ' म्हटले जाते. पण या दोन्ही नावात थोडा फरकही आहे.
- नवबौद्ध चळवळ :- बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना नवयान या नव-बौद्ध धम्माची दीक्षा दिली म्हणून या चळवळीस नवबौद्ध चळवळ म्हटले जाते. या चळवळीत सर्व वर्गातून बौद्ध झालेल्यांचे भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येतील प्रमाण ८७% (७३ लाख) आहे.
- दलित बौद्ध चळवळ :- नवबौद्ध चळवळालाच दलित बौद्ध चळवळ म्हटले जाते, कारण या चळवळीद्वारे बौद्ध बनलेले बहुतांश व्यक्ती हे पूर्वाश्रमीचे दलित होते. आज देशातील ७३ लाख नवबौद्धांत ५३ लाख दलित (अनुसूचित जाती) आहेत. म्हणजेच बहुतांश नवबौद्ध हे पूर्वीचे दलित असले तरी सर्वच नवबौद्ध दलित नव्हते, म्हणून या चळवळीस दलित बौद्ध चळवळ म्हणण्यापेक्षा नवबौद्ध चळवळ म्हणणे अधिक श्रेयस्कर आहे.