Jump to content

चर्चा:धूळपाटी/अ-मराठी सण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे प्रयोजन काय आहे? अमराठी म्हणले असता जगातील हजारो सण यात मोजता येतील. हे सगळे यात अपेक्षित आहेत काय? मराठी लोक अनेक "अमराठी" सणही साजरे करतात, उदा. रमझान, क्रिसमस, करवा चौथ. हे लेख कोठे जाणार? येथे अमहाराष्ट्रीय सण असे म्हणायचे आहे काय? असे केले असताही अनेक प्रश्न उपस्थित होतात.

प्रस्तुत लेखाचे प्रयोजन कळल्यास यात अधिक भर घालता येईल.

अभय नातू (चर्चा) ०८:३१, २५ नोव्हेंबर २०१६ (IST)[reply]

आता हा लेख वगळायला हरकत नाही, कारण लेखन करणाऱ्या सदस्याने कसल्याही स्वरुपाचा बदल केलेला नाहीये. WikiSuresh (चर्चा) ०३:४७, २७ मार्च २०१८ (IST)[reply]

शीर्षक अयोग्य असले तरी लेखातील यादी महत्वाची आहे. त्यामुळे केरळीय, तामिळी,राजस्थानी सण असे स्वतंत्र लेख होऊ शकतात का? यादीवरून त्या त्या सणांच्या लेखांना दुवे तयार होऊ शकतात.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:५९, २७ मार्च २०१८ (IST)[reply]

फ़ार फ़ारतर ही यादी भारतातील सण व उत्सव या लेखात विलीन करायला हरकत नाही, मुळातच सणांचे भाषावार विभाजन ही चुकीची बाब आहे, एक भाषा बोलणारे आणि वेगगेवगळ्या समुदाय/धर्म/प्रदेशाचे लोक असू असतात त्यामुळे समुदाय/धर्म/प्रदेशवार/ विभाजन केले जाऊ शकते. मराठी/अ-मराठी अशा शिर्षकावरून मला लहान मुले मराठी बाई/इंग्रजी बाई विनोद सांगायची त्याची आठवण झाली.:p WikiSuresh (चर्चा) ११:५३, २७ मार्च २०१८ (IST)[reply]