चर्चा:तेर (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संतोषजींचे,पुरातत्त्वीय उत्खनन स्थळांविषयी योगदान छानच होत आहे आणि तेर लेखातही चांगली माहिती आहे.जिथे संदर्भ अद्याप नमुद नाहीत ती माहितीही संदर्भ स्रोतातून असणार या बाबत शंका नाही.पण [[महाराष्ट्रातील स्थलनामे |स्थलनांमाच्या]] अभ्यासात मला रूची असल्यामुळे १)चालुक्यांच्या एका अभिलेखात २)राष्ट्रकूट नृपती नन्नराज याच्या इ.स. ६९३च्या सांगळूद ताम्रपटात चे मुळ दस्तएवजांचा शोध घेता यावा म्हणून संदर्भ सहज उपलब्ध असल्यास स्वागत असेल.

अधिक अभ्यासाच्या इच्छेच कारण सेंसस इंडीयात तगर स्थल नामाचा शोध घेतल्या नंतर बीड जिल्ह्यात ३ तगर आणि पश्चिम बंगाल मध्ये ३-४ तगर नावाची गावे दिसतात.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४८, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)

तगर/तेर[संपादन]

'पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी' या इ.स. ५० ते इ.स. १३० या काळात एका ग्रीक प्रवाशाने लिहिलेल्या ग्रंथाच्या ५१व्या प्रकरणामध्ये तेरचा तगर असा उल्लेख आलेला आहे. या पेरीप्लस... ग्रंथाव्यतिरीक्त तेरचा प्राचीन उल्लेख प्टॉलेमीने इ.स.च्या दुसर्या शतकात लिहिलेल्या प्रवासवर्णनातही केलेला आहे. त्याने तगर ही नगरी समुद्रकिनार्यापासून आत असून अरियके प्रदेशात आहे असे सांगितले आहे. तगर नगरीची दिशा सांगताना ही नगरी, सिरी टॉलेमाओस (सातवाहन घराण्यातील श्रीपुळुमावी) या राजाची राजधानी वैथन (पैठण) च्या ईशान्येस आहे अशीही माहिती त्याने दिलेली आहे. प्टॉलेमी हा भूगोलतज्ञ होता आणि त्याने दिलेली माहिती बहुतांशी सध्याच्या लेबेनॉनमधील टिअर येथील मॅरीनस याने जमविलेल्या माहितीवर आधारीत होती. प्राचीन स्थळांचे वर्णन करण्यापेक्षा त्यांचे अक्षांश-रेखांश देऊन त्यांचा ठावठिकाणा निश्चित करण्यावर प्टॉलेमीने जास्त भर दिला. मात्र भारताच्या आकाराबद्दलची त्याची माहिती बरोबर नसल्याने भारतातील अनेक स्थळांची निश्चित जागा चुकीची ठरलेली आहे. असे असले तरी त्याच्या पुस्तकातील भूगोलविषयक माहिती महत्वाची आहे.
तगरचे गूढ स्पष्ट करण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला. परंतु आता पेरीप्लसमध्ये उल्लेखिलेले तगर म्हणजेच सध्याचे तेर यात वाद राहिलेला नाही. याबाबतीत घोटाळा होण्याचे कारण असे होते की, तगर या नगराची पैठणच्या संदर्भात दिलेली दिशा चुकीची होती. वर उल्लेखिलेल्या पेरीप्लसच्या माहितीनुसार पैठणच्या पूर्वेस दहा दिवसांच्या प्रवासानंतर तगर येथे पोहोचता येत होते. याउलट इसवी सनाच्या दुसर्या शतकामध्ये प्टॉलेमी याने लिहिलेल्या पुस्तकात तगर हे पैठणच्या ईशान्येस असल्याचा उल्लेख केलेला आहे. वस्तुत: तेर हे पैठणच्या आग्नेयेस, पण काहिसे पूर्वेस ९४ मैल (१५१ किमी)वर आहे. या घोटाळ्यामुळे तगर हे स्थळ कोणते व ते कुठे असावे याबद्दल अनेक विद्वानांनी निरनिराळी मते दिलेली होती. विलफोर्ड, व्हिन्सेन्ट, मॅनर्ट आणि रिटेर यांनी तगर म्हणजे दौलताबादजवळील देवगड असे मत मांडले; तर भगवानलाल इंद्र यांनी तगरचा मेळ जुन्नरशी घातला. तगर हे नाव 'त्रिगिरी' (तीन टेकड्या) यापासून आलेले असावे आणि जुन्नरजवळ अशा तीन टेकड्या (अनेक बौद्ध लेण्यांसहित) असल्याने तगर म्हणजेच जुन्नर असे मत त्यांनी मांडले. यूल याने तगर म्हणजे कर्नाटकातील गुलबर्गा, तर ग्रॅंट डफ याने तगर हे मराठवाड्यातील बीडजवळ असावे असा कयास मांडला. राजवाडे यांनी तगर म्हणजे कनकगिरीपासून उत्तरेस सहा कोसांवर असलेले तवरगिरी हेच तगर असावे असे मत मांडले. याउलट फ्लीटने तगरची सांगड कोल्हापूरशी घातली. आणि भांडारकरांनी पैठणच्या आग्नेयेस ७० मैल (११० किमी)वर असणार्या धारुरचा मेळ तगरशी घातला.
सध्याच्या तेरशी प्राचीन तगरची सांगड घालण्याचे काम फ्लीट आणि कझिन्स यांनी केले. फ्लीट यांनी सुरुवातीला बॉम्बे गॅझेटियरमध्ये तगर म्हणजे कोल्हापूर किंवा करवीर असे नवीनच मत मांडले होते परंतू त्यांनी नंतर हे मत बदलून तगरचा तेरशी संबंध जोडला. इ.स. १९०१च्या नोव्हेंबरमध्ये कझिन्स यांनी तेरला भेट दिली आणि तेथील निरनिराळ्या प्राचीन वास्तूंची माहिती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या १९०२-१९०३ या वर्षाच्या वृत्तांतामध्ये प्रसिद्ध केली. आता प्राचीन तगर म्हणजे सध्याचे तेर यात संशय राहिलेला नाही.
नंतरच्या काळामध्ये खुद्द तेरला जे पुराभिलेख सापडले त्यामुळे तगर आणि तेर यांचा मेळ घालता आला. इ.स. ६१२ या काळातील पश्चिमी चालुक्यांच्या एका अभिलेखात ज्या ज्येष्ठशर्मन याला दान दिले तो तगरनिवासी (तगर येथे राहणारा) होता असा उल्लेख आहे. पुराभिलेखात तगरचा यानंतरचा उल्लेख सांगळूद ताम्रपटात येतो. हा ताम्रपठ अकोला जिल्ह्यात मिळालेला असून तो राष्ट्रकूट नृपती नन्नराज याच्या अमदानीतील आहे. उम्बरीकाग्राम आणि वटपूरग्राम या दोन खेड्यातील जमीन तगरनिवासी हरगण द्विवेदी याला दान दिली हे नमूद करण्यासाठी हा ताम्रपट दिलेला आहे. यात उल्लेखिलेली काही गावे अकोला जिल्ह्यातील आहेत हे लक्षात घेता मराठवाड्यातील तेर आणि वर्हाडातील अकोला यांचा सातव्या शतकात संपर्क येत होता हे स्पष्ट होते कारण हा लेख शके ६१५ म्हणजे इ.स. ६९३ या वर्षातील आहे.
प्रत्यक्ष तेरशी संबंध नसला तरी राष्ट्रकुटांचे आणखी तीन ताम्रपट तेरजवळील धाराशिव या गावाचा उल्लेख करतात. राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय याच्या काळात इ.स. ८०७, ८१० आणि ८१२ या वर्षात हे ताम्रपट दिले गेले. हे उल्लेखिलेले धाराशिव गाव म्हणजे तेरच्या नैॠत्येस असलेले सध्याचे उस्मानाबाद. इ.स. १९०४मध्ये तत्कालिन निजाम शासनाने धाराशिव हे नाव बदलून त्याचे उस्मानाबाद हे नाव प्रचलित केले. धाराशिव आणि तेर यांचे सानिध्य लक्षात घेता राष्ट्रकूट शासनाचा प्रभाव तेरवरही पडला असावा. मात्र लोहारा ताम्रपटातील धाराशिव या गावाची सांगड वा.वि. मिराशी विदर्भातील अकोटजवळील धारुर या गावाशी घालतात.
धाराशिवजवळ जैन लेणी आहेत आणि ती फर्ग्यूसन आणि बर्जेस यांच्या मते इ.स.च्या सातव्या शतकातील असावीत. इ.स.च्या दहाव्या शतकात हरिषेणाने लिहिलेल्या बृहत्कथाकोष या ग्रंथात धाराशिव येथील जिनमंदिरातील मूर्तींचा उल्लेख केलेला आहे. तेरापूर या गावाच्या दक्षिणेस धाराशिवच्या जंगलात या मूर्ती सापडल्याची माहिती या ग्रंथात दिलेली आहे. यावरुनही धाराशिव आणि तेर यांचा संबंध स्पष्ट होतो. अकराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या करकंडचरिउ या ग्रंथातही अशीच माहिती आढळते.
--संतोष दहिवळ (चर्चा) १३:२५, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)
अभ्यासपूर्ण प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५२, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)

इतरत्र सापडलेला मजकूर[संपादन]

इतरत्र सापडलेला मजकूर ये लेखात समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) ०७:५५, २६ मे २०१७ (IST)


तगर हे महाराष्ट्रातील अतिप्राचीन नगर होय.धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याचे तेर म्हणजे प्राचीन तगर होय.

ऐतिहासिक महत्व[संपादन]

येथल्या गढ्या नि टेकड्यांच्या आसपास प्राचीन विटांचे नि खापरांचे हजारो तुकडे सापडले.प्राचीन मणी आणि नाणीही येथे सापडतात.येथील जुनी घरे पाहिली की प्राचीनत्वाची कल्पना येते. सुमारे दोन सहस्र वर्षांपूर्वी तगर हे व्यापारी केंद्र म्हणून गाजते आहे.सातवाहनकाल हा महाराष्ट्राच्या नि हिंदुस्थानच्या इतिहासातीलही महत्वपूर्ण काल होय.अनेक अभ्यासकांनी या वैभवशाली काळाचे वर्णन केले आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक नवाश्मयुगीन दगडी कु-हाड सापडलेली आहे.

उत्कृष्ट मंदिर शिल्प[संपादन]

तेर येथे मंदिर शिल्पाचे काही उत्कृष्ट नमुने आढळतात.