चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (जपान)
Appearance
या लेखातील मजकूर वृत्तपत्रातील बातमी सारखा आहे. तो बदलून ज्ञानकोशीय शैली वापरावी.
अभय नातू (चर्चा) २३:१६, ७ ऑक्टोबर २०१७ (IST)
बदलानंतरही पुतळ्याशी संबंधित नसलेला मजकूर आहे तो काढावा.
अभय नातू (चर्चा) १९:५६, १० ऑक्टोबर २०१७ (IST)
प्रताधिकार भंग अहवाल
[संपादन]- महाराष्ट्र शासनाच्या बातमीवरुन हा लेख हिवाळे यांनी तयार केला आहे.
- ती बातमी १० सप्टेंबर, २०१५ रोजी आली होती आणि लेख (सद्य | मागील) २२:४७, ६ ऑक्टोबर २०१७ रोजी तयार केला आहे त्यामुळे हिवाळे यांनी प्रताधिकार भंग केला हे सिध्द होते त्यामुळे हे पानच काढून टाकण्यात यावे अशी मी विनंती करित आहे. WikiSuresh (चर्चा) १३:२९, ३ जुलै २०१८ (IST)
- प्रताधिकारित मजकूर काढला. २-४ दिवस लेखात कोणी भर घातली तर लेख राहू द्यावा अन्यथा काढला जाईल.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २२:०१, ३ जुलै २०१८ (IST)
- @अभय नातू:
- असे पुतळे मोठ्या संख्येने असावेत जगभरातील मिळून, अगदी पुणे विद्यापीठातील पुतळा पाहिला तर सुमारे दोन करोड खर्चुन 25/30 फ़ुटाची कलाकॄती आणि भोवताली बाग आहे, तसाच पुणे रेल्वे स्टेशन,पिंपरी ते रांची काय अगदी झारखंडमधील छोट्याश्या गिरडी शहरातही 25/30 फ़ुटी पुतळा आहे. अशी यादी करत राहिलं तर आत्ता माझ्या पाहाण्यात तरी पन्नास एकची यादी होईल. त्यामुळे असल्या लेखांची उल्लेखनीयताच प्रश्नांकित आहे. हिवाळेंनी हट्टाला पेटून अश्या लेखांची जंत्रिच केलीय, मी एक-एक करुन सगळं साफ़ करतो आहे आणि नविन मजकूर भरत आहे.
- हिवाळे यांनी केलेल्या याद्या तर हास्यास्पद आहेत, शिवाय संदर्भही नाही, प्रत्येक गल्लीबोळातल्या महापुरुषांच्या/स्त्रीयांच्या स्मारकांच्या याद्या आहेत, ते ही लेख मी काढून टाकण्याची विनंती नोंदवली आहे. आपण ते लेख पाहून निर्णय घ्यावेत. सहकार्याबद्दल धन्यवाद!WikiSuresh (चर्चा) ०३:२९, ४ जुलै २०१८ (IST)
विलीन
[संपादन]हा लेख कोयासन विद्यापीठ मध्ये विलीन केले पाहिजे असे वाटते --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:१०, ४ जुलै २०१८ (IST)