Jump to content

चर्चा:ठिपकेदार मुनिया

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र आढळलेला खालील मजकूर या लेखात समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) २३:४२, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


Scaly-Breasted Munia or Spotted Munia (Lonchura punctulata) 04
Spotted Munia (Lonchura punctulata) By Shantanu Kuveskar

मराठी नाव

[संपादन]

ठिपकेवाला मुनिया

इंग्रजी नाव

[संपादन]

Spotted Munia(स्पाॅटेड मुनिया)

शास्त्रीय नाव

[संपादन]

Lonchura punctulata(लाँच्युरा पंक्चुलाटा)

आकारमान

[संपादन]

१० से.मी

माहिती

[संपादन]

कोणत्याही पक्ष्याची चोच पाहिली,की त्याची जीवनशैली कळते.जीवनशैली (life-style) म्हणजे त्याचं राहणं-खाणं-पिणं-घरटं करणं-उडणं इत्यादी.या मुनियाची चोच पहा बुडाशी जाड आणि टोकाशी निमुळती होत गेलेली त्रिकोणी चोच असलेल्या मुनियाला गांडूळ पकडता येतील का? नाही.बरोबर! गवताच्या बिया किंवा धान्याचे दाणे भरडण्यासाठी त्याला चोचीचा उपयोग होतो.पावसाळ्यात वापर घरटं बांधण्यासाठी याच चोचीचा वापर करून मुनिया गवताचं हिरवगारं पानं खुडतो.जिथे शेत असेल तिथे मुनिया दिसतो. चॉकलेटी रंगाचा,चिमणीपेक्षा लहान असलेला मुनिया पोटाकडून पांढरा असतो.पोटांवरकाळ्या पिसांची जाळीदार नक्षी दिसते.या पक्ष्यांमध्ये नर-मादी सारखे दिसतात.यालाच तिलया मनोली असंही नाव आहे.मुनियाचं घरटं ऐन पावसात होतं. भरपूर पाऊस झाला,कीसगळीकडे हिरवगारं होतं. गवताची पातीवाऱ्यावर डोलाण्याइतपतमोठी झाली,की पिटुकला मुनिया घरटं बांधण्याच्या कामाला सरुवात करतो. चोचीनं गवताचं पान खुडतो आणि लगबगीनं घरट्यासाठी जागा निवडलेल्या झाडाकडे येतो. बाभूळ, हिवर, खैर अशी रानातली; तर कोयनेल, बोरानवेल, जाई-जुई, पानांचा अशोक अशी शहरातली झाडे निवडली जातात. जरा डोळ्यांपुढे आणण्याचा प्रयत्न करा- साधारण एखाद्या चिमणीचं पिल्लू वाटावं एवढ्या आकाराचा चॉकलेटी रंगाचा मुनिया आकाशात उडतोय आणि त्यानं चोचीत धरलेलं एक रसरशीत हिरवं पातं वाऱ्यावर भूरभूरतयं!' मुनियाचं घरटं म्हणजे फुटबॉलच्या आकाराचा छोटा चेंडू. या चेंडूला वरच्या दिशेला असलेलं वाटोळं भोक म्हणजे घरट्याचं दार. अशा या घरट्यात मादी ४ ते ८ अंडी घालते. १० सेंमी आकाराचा पक्षी एका वेळेस ८ अंडी उबवू शकेल का? अशक्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. या पक्ष्यात चक्क नर आणि मादी एकाच वेळेस घरट्यात बसून अंडी उबवतात. दोघंही मिळून पिल्लांसाठी चारा आणतात. लाल मुनिया (red muniya or avadavat) हा लाल रंगाचा सुंदर पक्षी नद्यांच्या, तलावांच्या काठी वाढलेल्या गवताळ भागात दिसतो. हे पक्षी पिंजऱ्यात पाळतात. मात्र असे पक्षी पिंजऱ्यात बागळणं आता गुन्हा आहे. पण हे लक्ष्यात ठेवा कि पिंजऱ्यातल्या पक्ष्याचं निरीक्षण करण्यापेक्षा मुक्तपणे उडणाऱ्या पक्ष्याचं निरीक्षण करणं खूपच मनोरंजक आणि अवघडहि असतं. मुनिया आणि वेडा राघू या दोन पक्ष्यांमध्ये एक वेगळचं नातं असतं.मुनिया नेहमी जमिनीवर,गवतामध्ये माना खाली घालून बिया वगैरे टिपत असतात. जमिनीपासून सुमारे पुरुषभर उंचीवर काय घडतयं हे त्यांना दिसत नसतं. वेडा राघू मात्र एखादया झाडाच्या अगदी कडेच्या फांदीवर बसलेला असतो.हवेत तिरतिरणाऱ्या चतुरांवर किंवा मधमाशांवर त्याचा डोळा असतो.

संदर्भ

[संपादन]

दोस्ती करूया पक्ष्यांशी:श्री. किरण पुरंदरे.