Jump to content

चर्चा:जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले पुतळे (छत्रपती संभाजीनगर)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे आणि अभय नातू: हा लेख औरंगाबाद लेखाचा एक विभाग होऊ शकतो. स्वतंत्र पान बनवणे उल्लेखनीयतेच्या नियमाने आवश्यक नाही असे वाटते. तरी याचे विलयन करण्यात यावे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:३१, ४ जानेवारी २०२१ (IST)[reply]

https://en.m.wikipedia.org/wiki/Category:Statues_by_country

https://en.m.wikipedia.org/wiki/Category:Statues_in_London

https://en.m.wikipedia.org/wiki/Category:Statues_by_city

https://en.m.wikipedia.org/wiki/Statue_of_Queen_Victoria_(Winnipeg)

ही वरील इंग्लिश विकिपीडियाचे दुवे पहावीत, ज्यात औरंगाबाद च्या पुतळ्याप्रमाणे खूप लेख असल्याचे दिसेल. जगातील उल्लेखनीय पुतळ्यांवर जर इंग्लिश विकिपीडियावर लेख तयार होऊ शकतात, तर आपण महाराष्ट्रातील उल्लेखनीय पुतळ्यांवर लेख का बनवू नये? महाराष्ट्रात हजारो पुतळे असतील पण त्यापैकी शेकडो जरूर उल्लेखनीय आहेत. हा फुले पुतळा शहरातील एक महत्त्वाचा पुतळा आहे. त्याची माहिती औरंगाबाद लेखात असावी पण संपूर्ण लेख तेथे विलीन करण्याची आवश्यकता वाटत नाही. माझ्या मते, महाराष्ट्रातील पुतळे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहेत. आणि विशेष ओळख असलेल्या उल्लेखनीय पुतळ्यांवर किमान मराठी विकिपीडिया तरी लेख असायला हवे. मराठी व इंग्लिश विकिपीडियाचा विचार करता या लेखाचे स्वतंत्र पान बनवणे उल्लेखनीयतेच्या नियमाने आवश्यक आहे असे वाटते. आपण जर महाराष्ट्रातील उल्लेखनीय पुतळ्यांचे लेख बनवने बंद करत असू तर आपण केवळ इंग्लिश विकि पुतळ्यांचीच आयात करण्यात धन्यता मानू. सरसकट कोणत्याही गल्लीतील पुतळ्यांवर लेख बनवावे, असे मी सांगत नाही आहे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १०:२१, ४ जानेवारी २०२१ (IST)[reply]