चर्चा:चमच्या (पक्षी)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख चमच्या नावाने देखील स्वतंत्रपणे दिसतो.. एकत्रीकरण व्हावे. प्रसाद साळवे (चर्चा) १२:३७, १७ एप्रिल २०१७ (IST)[reply]

चमच्या लेखातील मजकूर खाली आहे. त्यातील योग्य मजकूर या लेखात समाविष्ट करावा
अभय नातू (चर्चा) १७:३५, १८ एप्रिल २०१७ (IST)[reply]

Eurasian Spoonbill

चमचा हा एक पक्षी आहे. ह्याला मराठीत चमच्या, चाटू, किंवा दर्वीमुख हीही नावे आहेत. याची अन्य भाषांतील नावे अशी :

  • इंग्लिश : Eurasian spoonbill
  • गुजराथी : चमचो
  • तेलुगू : गंट मुक्कु कोंग, चमचा मुक्कु कोंग
  • नेपाळी : चम्चाठुँडे साँवरी
  • French : Spatule blanche
  • शास्त्रीय नाव : Platalea leucorodia
  • संस्कृत : खजाक, दर्विदा, श्वेत आटि
  • हिंदी : चमचवाला, चमचा, चमचा बाझ,चमजा, दाबिल, दाबिल, वगैरे

चमचा हा हिमशुभ्र रंगाचा जलचर पक्षी आहे. तो बदकापेक्षा मोठा असून त्याची मान लांब व पाय काळे व लांब असतात. त्याची चोच पळीच्या आकाराची लांब व काळी-पिवळी असते. त्याच्या गळ्यावर पिवळसर उडी रंगाचा डागासारखा ठिपका असतो. या चोचीच्या आकारावरून त्याला चमाचा हे नाव पडले.

वितरण[संपादन]

हा पक्षी भारतात आणि श्रीलंकेमध्ये निवासी आणि भटका असून .मुंबईचा हिवाळी पाहुणा आहे. हा पक्षी भारतात पिले जन्माला घालतो.

निवासस्थाने[संपादन]

दलदली, सरोवरे आणि चिखलाणी.

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली