चर्चा:घटस्थापना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नवरात्रोत्सव[संपादन]

हिंदु धर्मात भगवतीदेवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित असल्याने येथे त्याविषयी सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून एक विद्वान यांनी दिलेली माहिती येथे देत आहोत.


नवरात्रोत्सव : घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. - एक विद्वान

नवरात्रोत्सवात श्री दुर्गादेवीने दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळातील पृथ्वीवरील त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे : नवरात्रीतील नऊ दिवसांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित ब्रह्मांडात विहार करते. आदिशक्तीचे हे दरदिवशी नव्या रूपांसहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळातील पृथ्वीवरील त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे. हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक रूपी चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व श्री दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला करत असते. याचे प्रतीक म्हणून घट व त्यातील नंदादिप यांना प्रतिकात्मक रूपात पूजले जाते. घटात दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायूमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणार्‍या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात घटपूजन केल्याने वास्तूमध्येही श्री दुर्गादेवीचे मारक चैतन्य कार्यरत होऊन वास्तूतील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते. - एक विद्वान


1. नवरात्रात करावयाची उपासना

2. साडेतीन शक्तीपीठ

3. नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याचे, तसेच त्या वेळी मध्ये हत्तीची प्रतिमा ठेवण्यामागचे अध्यात्मशास्त्र

4. नवरात्रात गरबा खेळण्यामागील शास्त्र

5. नवरात्रात नित्यनेमाने करावयाचा पूजाविधी

6. नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी का फुंकतात ?

7. नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करण्यामागील शास्त्र काय ?

8. नवरात्र म्हणजे ईश्वराचे देवीच्या रूपात साकार होणारे प्रीती व व्यापकत्व या गुणांचे सर्वोच्च स्तरावरील दर्शन !

Read Above details at...


Gnome-edit-redo.svgअभय नातू: हा स्वतंत्र लेख शारदीय नवरात्र मध्ये विलीन करावा असे वाटते किंवा येथे शारदीय नवरात्र असे पुनरनिर्देशन करावे. धन्यवाद !आर्या जोशी (चर्चा) १६:१३, ३ ऑक्टोबर २०१८ (IST)

घटस्थापनेबद्दल अधिक माहिती लिहून होईपर्यंत विलीन करावा. जर/जेव्हा घटस्थापनेतील विविध चालीरीतींबद्दल मोठी माहिती मिळेल तेव्हा पुन्हा एकदा नवरात्र लेखात थोडी माहिती व दुवा ठेवून स्वतंत्र लेख करावा. -- अभय नातू (चर्चा) १९:५०, ३ ऑक्टोबर २०१८ (IST)