Jump to content

चर्चा:गुडी (निःसंदिग्धीकरण)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझ्या माहितीनुसार कानडी भाषेतही गुडीचा अर्थ तेलुगू (लेखात दिल्यानुसार) गाव किंवा मंदिर असा होतो.

अभय नातू (चर्चा) २३:१७, २८ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]


हो बरोबर आहे. तेलंगाणा आणि उत्तरकर्नाटकात गाव किंवा मंदिर असा वापर अधिक असावा. मुलत: गुडी ह्या शब्दाचा अर्थ तेलगूत काठी असाच होता (आणि तो अर्थ मराठीत सुद्धा बऱ्यापैकी वापरात राहून नंतर गुढी शब्दापुरता उरला काठी हा अर्थ मराठी वापरातून गळून पडला असावा), गुडी हा शब्द प्राचीन मराठीत जंगलातील झोपडी या अर्थाने वापरला गेलेला आहे तो कुडी या हिंदी शब्दाला कॉग्नेट करतो क अक्षरास ग हे अक्षर द्रावीडी उच्चारात वर्ण विपर्यायाने येते. कर्नाटकातील अगदी काही शतकांपुर्वी पर्यंतची मंदिरे लाकडी असत आणि त्यांना गुडी असा शब्द प्रचलीत असावा आणि तोच शब्द नंतर इतरही मंदिरांना वापरला गेला असावा. किंवा मुर्ती पूजा सुरू होण्यापुर्वि दक्षिणेतही काठीपूजा प्रचलीत असेल आणि काठी पूजेच्या स्थांनांना गुडी म्हणत असतील त्याच जागांवर मंदिरे होऊन गुडी शब्द दक्षीणे वापरला गेला का ह्याचा शोध व्हावयास हवा. भारतातल्या दक्षिण भागातल्या काठी पूजा प्रकारांचा शोध घ्यावयाचा आहे, त्या आधी हा लेख बनवून घेतो आहे.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:४०, २८ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]